चिखलगावला नेत्रतपासणी शिबिरास प्रतिसाद

चिखलगावला नेत्रतपासणी शिबिरास प्रतिसाद

पौड, ता. २७ : चिखलगाव (ता. मुळशी) ग्रामपंचायत आणि डिलिजंट नर्सिंग ट्रस्ट पुणे यांच्यावतीने चिखलगाव येथे मोफत नेत्र तपासणी व डोळ्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती शिबिर आयोजित केले होते.
या वेळी संगणकाद्वारे ग्रामस्थांची मोतीबिंदू व काचबिंदू तपासणी केली. या शिबिराचा दहा वर्षांपुढील सर्व महिला पुरुष व युवकांनी लाभ घेतला. लाभार्थ्यांना ट्रस्टद्वारे अल्पदरात चष्मे उपलब्ध करून देण्यात आले.
या वेळी चिखलगावचे सरपंच किरण राम फाले, उपसरपंच कल्याणी भालेराव, माजी सरपंच लहू फाले, तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन फाले, पोलिस पाटील कृष्णा फाले, धोंडीबा फाले, नवनाथ फाले, गणपत फाले, सुनील भालेराव, ग्रामपंचायत सदस्या ऊर्मिला फाले, आशा वर्कर माधुरी फाले, रूपाली फाले, उज्वला मानकर, गोविंद फाले, दत्तू फाले, अनिल फाले, पंडू फाले, गणपत भालेराव, शकुंतला फाले, मंगल फाले, साक्षी फाले, वर्षा जोशी, कांताबाई भालेराव आदी उपस्थित होते. उपसरपंच कल्याणी भालेराव यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com