
जिल्ह्यात ७६८ गावांमध्ये ८८९ शवदाहिनी उभारणार
पुणे, ता. २२ : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावांमधील स्मशानशेडमध्ये लोखंडी शवदहिनी बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेने खास योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ७६८ गावांमध्ये एकूण ८८९ गावांमध्ये शवदाहिण्या सुरू करण्यात येणार आहेत.
या शवदाहिन्या उभारण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने प्रत्येक शवदाहिणीसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावांमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या प्रत्येक स्मशानभूमीत आता शवदाहिणी सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
या शवदहिणींची रचना महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाने केली असून, अभियांत्रिकी कॉलेज आणि अभियांत्रिकी सल्लागारच्या विविध तज्ज्ञांनी त्याची पडताळणी केली आहे. या शववाहिन्यांमुळे अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लाकडात ५० टक्के कपात होणार आहे. शिवाय पर्यावरण रक्षण होण्यास मदत होईल. पर्यायाने जिल्ह्यातील जैवविविधता टिकून राहण्यास फायदा होणार आहे.
- आयुष प्रसाद,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.
जिल्ह्याची वार्षिक आकडेवारी
सरासरी होणारे मृत्यू- सुमारे ३० हजार
अंत्यविधीसाठी वर्षात आवश्यक लाकूड- सुमारे १० हजार टन
अंत्यविधीमुळे होणारे कार्बन उत्सर्ज- सुमारे ४० हजार टन
तालुकानिहाय शववाहिन्या होणाऱ्या गावांची संख्या व कंसात शववाहिनी संख्या
आंबेगाव ---- ३४ (३४)
बारामती ----४३ (४३)
भोर ----४७ (४७)
दौंड ----५१ (५१)
हवेली --- ३४ (३४)
इंदापूर ----६३ (६३)
जुन्नर ----७४ (७९)
खेड ----१०२ (११०)
मावळ ----९२ (११९)
मुळशी ----४५ (७२)
पुरंदर ---- ४९ (७३)
शिरूर ----७० (८४)
वेल्हे ---६४ (८०)
एकूण ---- ७६८ (८८९)
Web Title: Todays Latest District Marathi News Pzp22b00707 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..