
देलवडी सोसायटीच्या अध्यक्षपदी शेलार
राहू, ता. १० : देलवडी (ता. दौंड) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी अनिल शेलार यांची तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण टकले यांची बिनविरोध निवड झाली. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये जय मल्हार सहकार पॅनेलने बहुमत प्राप्त केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक हर्षद तावरे, डी. एन. शितोळे यांनी काम पाहिले. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव वाघोले, दत्तात्रेय शेलार, दत्तात्रेय कोंडे, बापूराव टुले, रामकृष्ण टुले, ज्ञानदेव शेलार, गणपत लव्हटे, गणेश गायकवाड, मिलन शेलार, आशा झांजे, महेश शेलार, सतीश टुले, दिलीप शेलार, अभय शेलार, सचिन शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. निवडीनंतर अध्यक्ष शेलार, उपाध्यक्ष टकले यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यावर अधिक भर दिला जाईल. सोसायटीचा कारभार अत्यंत पारदर्शकपणे करून भविष्यात सभासदांना लाभांश वाटप केले जाईल, असे शेलार, टकले यांनी निवडीनंतर सांगितले.
01478, 01479
Web Title: Todays Latest District Marathi News Rah22b00716 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..