
डॉ. सांगोलेकर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार
राहू, ता. १० : खुटबाव (ता. दौंड) येथील भैरवनाथ शिक्षण मंडळाच्या पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या सेवापूर्तीनिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ. सांगोलेकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
प्रसिद्ध कवी भरत दौंडकर यांनी प्राचार्य डॉ. सांगोलेकर यांच्या मराठी गझलेतील योगदानावरही प्रकाश टाकला आणि त्यांची '' माणूस मारणारे ते लोक कोण होते?, ही प्रसिद्ध गझलही सादर केली.
यावेळी भैरवनाथ शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार रमेश थोरात, सचिव सूर्यकांत खैरे, उपाध्यक्ष भाऊसाहेब ढमढेरे, प्राचार्य डॉ. गोविंद राजेनिंबाळकर यांची भाषणे झाली. अरुण थोरात, मनोज थोरात, योगेश थोरात यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. जगदीश औटी, डॉ. नंदकुमार जाधव, अनिल सोनवणे, डॉ. धनंजय भिसे, प्राचार्य डॉ. सांगोलेकर यांनी वयाच्या पासष्टीनिमित ६५ ग्रंथ महाविद्यालयास भेट दिले.
सूत्रसंचालन डॉ. मल्हारी मसलखांब यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक अरुण थोरात यांनी केले. आभार प्रा. निखिल होले यांनी मानले.
Web Title: Todays Latest District Marathi News Rah22b00719 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..