मुलांना चांगली पुस्तके वाचायला द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलांना चांगली पुस्तके वाचायला द्या
मुलांना चांगली पुस्तके वाचायला द्या

मुलांना चांगली पुस्तके वाचायला द्या

sakal_logo
By

राहू, ता. २ : ''''आयुष्यामध्ये मोठी स्वप्न पहा, नक्की यशस्वी व्हाल. आपण पुढील पिढीसाठी चांगले काहीतरी करता येईल का हा विचार केला पाहिजे. आनंद व सुख या संकल्पनांचा पैशाशी संबंध नाही. मुलांच्यात कमावण्याची लायकी निर्माण करा. त्यांना चांगली पुस्तके द्या,'''' असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी केले.

देलवडी (ता. दौंड) येथे जयमल्हार व्याख्यानमालेमध्ये ''जीवन सुंदर आहे'' या विषयावर शिंदे बोलत होते. यावेळी आमदार राहुल कुल म्हणाले की, देलवडी गावातील सामाजिक उपक्रमांचे अनुकरण तालुक्यातील इतर गावांनी केले पाहिजे .१०० इंजिनिअर व ४० शिक्षक असणाऱ्या या गावाचे मला कौतुक वाटते.
यावेळी सेवानिवृत्त एलआयसी अधिकारी राजेंद्र शेलार व कृषी अधिकारी विलास थोरात यांना मल्हार रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कौस्तुभ कुलकर्णी, विकास टकले, प्रवीण शेलार यांनी तयार केलेल्या देलवडी वेबसाइटचे उद्‌घाटन करण्यात आले. राजेंद्र शेलार, महादेव शेलार, डॉ. रामदास काटे, प्रकाश शेलार, गणेश खेडेकर सोमनाथ बंड, डॉ. विकास टकले यांनी संपादित केलेल्या ''मल्हार मल्हारनगरीचे सुपुत्र'' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मानपत्रवाचन डॉ. रामदास काटे, नरेंद्र बंड यांनी केले.
माधव टकले, भाऊसाहेब शेलार, दत्तात्रेय शेलार, गौतम गायकवाड, प्रशांत मुथा, माऊली शेलार, अनिल किसन शेलार यांना गौरवण्यात आले. या वेळी महेश पासलकर, माऊली ताकवणे, सर्जेराव जेधे, बाळासाहेब थोरात, आबासाहेब खळदकर, तुकाराम ताकवणे, विकास शेलार, नरेंद्र काटे, प्रवीण शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
सोमनाथ बंड यांनी प्रास्ताविक तर प्रकाश शेलार यांनी सूत्रसंचालन केले. आभार गणेश शेलार यांनी मानले. संयोजन धनंजय पुणेकर, अमोल शेलार, ज्ञानदेव शिर्के, नामदेव शेलार, योगेश भालेराव, अशोक चांदगुडे, सुभाष जाधव, विजय गजरे, संदीप लव्हटे, सुरेश अडागळे, डॉ. सुधीर पवार यांनी केले.
01512

Web Title: Todays Latest District Marathi News Rah22b00731 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top