खामगावच्या उपसरपंचपदी तुषार बहिरट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खामगावच्या उपसरपंचपदी तुषार बहिरट
खामगावच्या उपसरपंचपदी तुषार बहिरट

खामगावच्या उपसरपंचपदी तुषार बहिरट

sakal_logo
By

राहू, ता. ७ : खामगाव (ता. दौंड) : येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आमदार राहुल आमदार राहुल कुल समर्थक तुषार धनंजय बहिरट यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी पी. बी. नाळे यांनी दिली. उपसरपंच कैलास खेडेकर यांचा ठरलेला कालावधी पूर्ण झाल्याने त्यांनी स्वखुशीने राजीनामा दिला. उपसरपंचपदासाठी बहिरट यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच योगेश मदने यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया शांततेत राबविण्यात आली. या प्रसंगी ज्येष्ठ नेते जगन्नाथ नागवडे, माजी सरपंच सुखदेव चोरमले, कैलास खेडेकर, विकास कुल, सदाशिव बर्वे, राजेंद्र जगताप, नवनाथ भालसिंग , गोपीनाथ टिळेकर, संजय नागवडे, शैलेश कांबळे, दादासाहेब कोळपे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
01608

Web Title: Todays Latest District Marathi News Rah22b00774 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..