Mon, Jan 30, 2023

नांदूर सोसायटीच्या अध्यक्षपदी पोपटराव बोराटे
नांदूर सोसायटीच्या अध्यक्षपदी पोपटराव बोराटे
Published on : 27 September 2022, 8:34 am
राहू, ता. २७ : नांदूर (ता. दौंड) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी नांदूरचे माजी सरपंच पोपटराव कुंडलिक बोराटे यांची तर, उपाध्यक्षपदी सखाराम साधू बोराटे यांची निवड झाली. याप्रसंगी माजी उपसरपंच विशाल थोरात, संस्थेचे संचालक दत्तात्रेय बोराटे, योगेश बोराटे, ज्ञानदेव थोरात, दौलत थोरात, विजू थोरात, प्रशांत बोराटे, बापू गायकवाड, लक्ष्मण घुले, तंटामुक्ती अध्यक्ष दत्ता बर्वे, जमालउद्दीन शेख, अमोल बोराटे, अप्पा घुले, रामदास बोराटे, दिलीप बोराटे, अप्पा बोराटे, विजय बोराटे आदी उपस्थित होते. निवडणूक अधिकही म्हणून सहाय्यक निबंधक हर्षित तावरे व सोसायटीचे सचिव कैलास कोळपे यांनी काम पाहिले.