शिकारीच्या सापळ्यात अडकून लडकतवाडीत बिबट्याचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिकारीच्या सापळ्यात अडकून
लडकतवाडीत बिबट्याचा मृत्यू
शिकारीच्या सापळ्यात अडकून लडकतवाडीत बिबट्याचा मृत्यू

शिकारीच्या सापळ्यात अडकून लडकतवाडीत बिबट्याचा मृत्यू

sakal_logo
By

राहू, ता. ८ : लडकतवाडी (ता. दौंड) येथील उसाच्या शेतावर शिकारीसाठी अज्ञात व्यक्तीने लोखंडी साखळी जोडलेला पंजा ठोकून सापळा ठेवला. मात्र, त्यात अडकून बिबट्याचा तडफडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळतात दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे, वनपाल सचिन पुरी, वन संरक्षक नानासाहेब चव्हाण, वन संरक्षक दीपक पवार, सुरेश पवार, विलास होले, सुनीता शिरसाठ यांनी घटनास्थळी भेट दिली.
पिंपळगाव येथील वन विभागाच्या हद्दीत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिकारी करण्याच्या उद्देशाने हा ट्रॅप लावल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हा बिबट्या नर जातीचा असून, पाच ते सहा वर्षाचा होता. या घटनेची सखोल चौकशी करून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पुणे वन विभागाचे सहायक वन संरक्षक दीपक पवार यांनी सांगितले.