
''श्रीनाथ''च्या ७० हजार साखर पोत्यांचे पूजन
राहू, ता. १३ : पाटेठाण (ता.दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यांकडून २०२२-२३ मधील उत्पादित केलेल्या एक लाख ७० हजार साखर पोत्यांचे पूजन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे, कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांच्या हस्ते झाले. कोवीडच्या महामारीमध्ये दिवंगत झालेल्या सभासदांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य आणि शेतकऱ्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी परांडे म्हणाले, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने सामाजिक बांधिलकीचे नाते जपत कोरोनाच्या महामारीच्या काळात मोलाचे कार्य केले आहे. हिंदू धर्मात आपण काळी आई, प्राणवायू , नद्या-नाले, सूर्यप्रकाश, पृथ्वी, झाडे यांची पूजा करून रक्षण करतो ही देखील कृतज्ञताच आहे. शेती करताना रासायनिक खतांचा वापर करू नका.
कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत म्हणाले, तीन वर्षाचा कोरोंनाचा कालावधी खूप वेदनदायी होता. कारखान्याच्या वतीने समाजातील गोरगरीब आर्थिक दृष्ट्या कुटुंबांना मोठी आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी तळेगाव ढमढेरे परिसरात मोफत वसतिगृह सुरू आहेत. कारखाना स्थळावर ऊस तोडणी कामगार मजुरांसाठी साखर शाळा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
दरम्यान, सुरेश महाराज साठे, वरद विनायक वारकरी शिक्षण संस्थेकडून अध्यात्माचे शिक्षण घेत असलेल्या बालचमुंनी आपली भजनाची सेवा केली. या
प्रसंगी कार्याध्यक्ष विकास रासकर, संचालक योगेश ससाणे, किसन शिंदे, अनिल भूजबळ, हनुमंत शिवले, भगवान मेमाणे, सुरेशमहाराज साठे, विकास शितोळे, चंद्रकांतमहाराज धायगुडे, बापू महाराज टेंगले, बापूमहाराज गाढवे, विठ्ठलमहाराज लवंगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डी.एम.रासकर, बी. एम. नरके आदी उपस्थित होते. विकास रासकर प्रास्ताविक यांनी केले. सूत्रसंचालन एस. बी. टिळेकर यांनी केले. किसन शिंदे यांनी आभार मानले.
दिवंगत सभासदांच्या वारसदारांना २५ हजारांची मदत
जाईबाई टकले (मिरवडी), मिलिंद जगताप (राहू), गोविंद कोंडे (मिरवडी), अमित शिंदे (राहू), अनुप कुमार टुले (वाळकी), सोमनाथ ताकवणे (पारगाव), सुमित कौले (नानगाव), ज्योती जगताप (मांडवगण फराटा), विठ्ठल राक्षे (राक्षेवाडी), प्रकाश लडकत (लडकतवाडी), वैभव जगताप (खामगाव), लक्ष्मण टिळेकर (टिळेकरवाडी), गीता नवले (राहू), अक्षय गव्हाणे (डिंग्रजवाडी), संदीप भुजबळ (भिमासेत) यांना २५ हजारांची मदत देण्यात आली.
01694