पाटेठाण ग्रामपंचायतीवर कुल गटाचे वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटेठाण ग्रामपंचायतीवर कुल गटाचे वर्चस्व
पाटेठाण ग्रामपंचायतीवर कुल गटाचे वर्चस्व

पाटेठाण ग्रामपंचायतीवर कुल गटाचे वर्चस्व

sakal_logo
By

राहू, ता. २६ : राजकीयदृष्ट्या तुल्यबळ आणि संघर्षमय समजल्या जाणाऱ्या दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेवटच्या टोकावर असणाऱ्या पाटेठाण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आमदार राहुल कुल समर्थक भैरवनाथ जनसेवा पॅनेलच्या उमेदवार उषा दत्तात्रेय पिंपळे यांनी माजी आमदार रमेश थोरात समर्थक विरोधी भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या अर्चना सर्जेराव कारकूड यांचा अवघ्या तेरा मतांनी पराभव केला.
सदस्यपदाच्या निवडणुकीत कुल गटाकडून दुर्गा संदीप पिंपळे यांनी थोरात गटाच्या अर्चना कारकूड यांचा १६ मतांनी पराभव केला.
पाटेठाण ग्रामपंचायतीचे सरपंचपद व सदस्यपदाची एक जागा रिक्त होती. त्यासाठी नुकतीच पोटनिवडणूक झाली. त्यात विजयी भैरवनाथ जनसेवा पॅनेलचे नेतृत्व विजयकाका हंबीर, माजी सरपंच ज्योती यादव, पाटील यादव, माजी उपसरपंच सुरेश हंबीर, पाटेठाण सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र वडघुले, बापूसाहेब हंबीर, अमोल हंबीर, किसन घाडगे, रोहिदास हंबीर, सोमनाथ हंबीर, अनिल पाबळे, बाबूराव हंबीर, विक्रम हंबीर, शिवाजी हंबीर, शांतिलाल दरवडे, विठ्ठल मांढरे आदींनी केले. तर, पराभूत भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व माजी सरपंच बाळासाहेब हंबीर, खरेदी विक्री संघाचे संचालक पुरुषोत्तम हंबीर, ज्योती झुरंगे, संदीप हंबीर, अमोल झुरंगे, मनोज हंबीर, कैलास झुरंगे आदींनी केले.

सासू-सुनेचा विजय
पाटेठाण येथील पंचवार्षिक निवडणुकीत भैरवनाथ जनसेवा पॅनेलकडून उषा पिंपळे सरपंचपदासाठी व त्यांची सून दुर्गा पिंपळे या सदस्यपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. गावाची सेवा करण्याची संधी लाभल्याने सासू सुनेच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले.