राजगुरुनगर स्थानकात प्रवाशांची त्रेधातिरपीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजगुरुनगर स्थानकात प्रवाशांची त्रेधातिरपीट
राजगुरुनगर स्थानकात प्रवाशांची त्रेधातिरपीट

राजगुरुनगर स्थानकात प्रवाशांची त्रेधातिरपीट

sakal_logo
By

राजगुरुनगर, ता. ३० :  एस. टी. कर्मचारी संपानंतर राजगुरुनगर आगारातून ऐंशी टक्के मार्गांवर बस सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मात्र दुसऱ्या बाजूला  एस. टी. बस स्थानकाला खड्डे, बेकायदा पार्किंग, अतिक्रमणे, मद्यपी, अव्यवस्था इत्यादी समस्यांनी घेरले आहे. राजगुरुनगरला प्रशस्त एस. टी बस स्थानक  आणि आगाराची दुरवस्था झालेली आहे.  डांबर ठिकठिकाणी उखडले आहे. अनेक ठिकाणी  खड्डे  पडले आहेत. त्यामुळे पावसाने पाणी साचले की  बसमधून चढउतार करताना आणि  स्थानकात वावरताना प्रवाशांची त्रेधातिरपीट उडते.

स्थानकाला चोहोबाजूंनी अतिक्रमणांनी घेरले आहे. या अतिक्रमित इमारती अथवा गाळ्यांमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकसंख्येचा आणि वाहनांचा ताण  स्थानकावर पडतो.  दिवसभर अनेक बेकायदा वाहने येथे पार्क केली जातात. भिकारी, मद्यपी, वेडे, मनोरुग्ण, चोरटे, पाकिटमार यांनाही त्यामुळे मुक्तद्वार आहे. अनेक अनाहूत  स्थानकातील बाकांचा वापर करीत असल्याने प्रवाशांना  बसायला जागा राहत नाही. प्रशासनाचे यावर अजिबात नियंत्रण राहिलेले नाही. स्थानकाबाहेर फळविक्रेते तळ ठोकून आहेत. या परिस्थितीमुळे अनेक गाड्या स्थानकात न येता बाहेरूनच निघून जातात. स्थानकात वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते.


''आओ जाओ घर तुम्हारा''
स्थानकात मध्येच बांधून ठेवलेल्या स्वच्छतागृहामुळे एसटी बस फिरविताना अडथळा निर्माण होतो. स्टॉल्स, शौचालय, ''पे आणि पार्क'' साठी जागा, जाहिरातीचे फलक, बेकायदा पार्किंग केलेल्या गाड्या यांमुळे मोठी जागा असूनही गर्दी असते. स्थानकाला प्रवेशद्वार आणि अनेक ठिकाणी संरक्षक भिंत उरली नसल्याने हे  स्थानक  म्हणजे ''आओ जाओ घर तुम्हारा'' झाले आहे.

स्थानकातील खड्डे बुजवावेत यासाठी स्थापत्य विभागाशी पत्रव्यवहार केलेला आहे. मध्यंतरी संपामुळे खासगी गाड्या आगाराच्या आवारात उभ्या राहत होत्या. आता बाहेरचे वाहन आढळले की आम्ही आर. टी. ओ. कडे तक्रार करतो. येथे स्थानिक वाहनचालक आमच्या कर्मचाऱ्यांना उद्धट बोलतात. पोलिसांनीच त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे.
शिवकन्या थोरात, आगारप्रमुख, राजगुरुनगर आगार

राजगुरुनगर (ता. खेड) : एसटी  स्थानकात पडलेले  खड्ड्यांमुळे पावसात प्रवाशांची त्रेधातिरपीट उडते.
01808

Web Title: Todays Latest District Marathi News Raj22b01115 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top