राजेंद्र जवळेकर यांच्यावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजेंद्र जवळेकर यांच्यावर गुन्हा
राजेंद्र जवळेकर यांच्यावर गुन्हा

राजेंद्र जवळेकर यांच्यावर गुन्हा

sakal_logo
By

राजगुरुनगर, ता. २९ : खेड तालुक्यातील वाफगाव येथे आपसांत मारहाण व पोलिसांशी गैरवर्तन केल्याबद्दल खेडचे माजी उपसभापती राजेंद्र जवळेकर यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत फौजदार भारत भोसले यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून, शुभम कानपिळे, पंकज ऊर्फ टिल्या सुर्वे, मयूर ऊर्फ भय्या सुर्वे, पप्पू कानपिळे, राजेंद्र वसंतराव जवळेकर (सर्व रा. वाफगाव, ता. खेड) आणि केतन पवार, अजिंक्य राक्षे (रा. राक्षेवाडी, ता. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या संशयित आरोपींनी यात्रेच्या दिवशी (ता. २८) मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास वाफगाव येथे जिल्हा बँकेच्या शाखेजवळ पोलिस वाहनासमोर मोटार लावण्याच्या कारणावरून आपापसांत झोंबाझोंबी करून एकमेकांना मारहाण केली. तसेच, शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी पोलिसांनी गर्दी पांगवली. त्यावेळी जवळेकर याने दारू पिऊन मोठमोठ्याने आरडाओरडा केला व पुन्हा गर्दी जमा केली. तसेच, पोलिसांशी उर्मटपणे वर्तन करून शांतता भंग केली.

वाफगाव घटनेत संशयित आरोपींनी पोलिसांशी धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणला. तरीही खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांनी त्याचे कलम लावले नाही. संशयितांशी तडजोड करून त्यांनी हे कलम वगळले. त्यामुळे या प्रकरणात त्यांची चौकशी व्हावी.
- दिलीप मोहिते, आमदार

वाफगावच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांशी बाचाबाची झाली, मात्र धक्काबुक्की झाली नाही. स्वतः पोलीसच समक्ष हजर असल्याने आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग असल्याने गफलत होण्याचा प्रश्न नाही. त्यामुळे घटनेनुसार गुन्ह्याची कलमे लावली आहेत. तडजोड वगैरे काही झालेली नाही.
- सतीश गुरव, पोलिस निरीक्षक, खेड पोलीस ठाणे

Web Title: Todays Latest District Marathi News Raj22b01118 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top