खेड लोकअदालतीत १६ कोटींची वसुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड लोकअदालतीत
१६ कोटींची वसुली
खेड लोकअदालतीत १६ कोटींची वसुली

खेड लोकअदालतीत १६ कोटींची वसुली

sakal_logo
By

राजगुरुनगर, ता. ९ : येथील खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमधे १५९ न्यायालयीन खटले तडजोडीतून मिटविण्यात आले. बँक वसुली व कर वसुली या संदर्भातील दाखलपूर्व ६०० प्रकरणे तडजोडीने मिटवून वसुली केली. दाखलपूर्व व प्रलंबित दाव्याच्या माध्यमातून सुमारे १६ कोटी १४ लाख रुपयांची वसुली केली.
या लोकअदालतीचे उद्‍घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. राजूरकर व राजगुरुनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ गावडे यांच्या हस्ते झाले. या वेळी राजगुरुनगर न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. अंबळकर, एस. एन. पाटील, दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. एस. पाखले, के. एच. पाटील, जी. बी. देशमुख, श्रीमती आर. डी. पतंगे, डी. बी. पतंगे, पी. ए. जगदाळे, श्रीमती एन. एस. कदम आदी उपस्थित होते. राजगुरुनगर बार असोसिएशनच्या सदस्या ॲड. रश्मी वाघुले यांनी सूत्रसंचालन; तर ॲड. गावडे यांनी प्रास्ताविक केले. खजिनदार ॲड. प्रवीण पडवळ यांनी आभार मानले.
या लोकअदालतीत पॅनल ॲडव्होकेट म्हणून अ‍ॅड. योगेश मोहिते, अ‍ॅड. माया डांगले, अ‍ॅड. कृष्णा भोगाडे, अ‍ॅड. श्रीमती सुवर्णा ढोरे, अ‍ॅड. अपेक्षा धुमाळ, अ‍ॅड. अर्चना राक्षे, अ‍ॅड. वैभव कान्हूरकर, अ‍ॅड. आदिनाथ कड यांनी काम पाहिले. लोकअदालतीत ॲड. संतोष दाते, अ‍ॅड. ललित नवले, सचिव अ‍ॅड. गोपाल शिंदे, अ‍ॅड. रेश्मा भोर, लोकल ऑडिटर अ‍ॅड. संदीप दरेकर, सदस्य अ‍ॅड. अबुबकर पठाण, अ‍ॅड. नीलेश देशमुख, अ‍ॅड. प्रतिभा होले, माजी अध्यक्ष अ‍ॅड. देविदास शिंदे पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Raj22b01133 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top