कांदा भासवून गोमांसाची वाहतूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदा भासवून गोमांसाची वाहतूक
कांदा भासवून गोमांसाची वाहतूक

कांदा भासवून गोमांसाची वाहतूक

sakal_logo
By

राजगुरुनगर, ता. ९ : पुणे-नाशिक महामार्गावरून कांद्याच्या गोण्यांची वाहतूक करतोय, असे भासवून प्रत्यक्षात गोमांस घेऊन चाललेल्या मालवाहतूक जीपला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी खेड पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या प्रकरणी २ जणांवर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक मालवाहतूक जीप (क्र. एमएच १७ बीवाय ७५७४) पुणे-नाशिक महामार्गावरील चांडोली (ता. खेड) फाट्याजवळ उभी होती. त्या जीपमध्ये गोमांस असल्याचे बजरंग दलाच्या दीपक गावडे, राजेश लांडे, अतुल कुलकर्णी, मयूर सावंत, मयूर भगत या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी खेड पोलिसांना बोलावले. पोलिस हवालदार स्वप्नील लोहार व आर. एस. जाधव यांनी दोन पंच बरोबर घेतले आणि चांडोली फाट्याजवळ गेले. तेव्हा त्या मालवाहतूक जीपमध्ये मागच्या बाजूस कांद्याच्या गोणी रचलेल्या होत्या. मात्र, आतील बाजूस ९०० किलो वजनाचे साधारण २७ हजार रुपये किमतीचे गोमांस होते. पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून तशी खात्री करून घेतली. त्यानंतर गोमांसाची वाहतूक करणारा चालक सलीम अब्दुल कपडे (वय ४५, रा. नालासोपारा पश्चिम, ठाणे) व त्याचा साथीदार अल्फाराज लियाकत पठाण (वय २२, रा. संगमनेर, जि. नगर) या दोघांविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला व अटक केली.

Web Title: Todays Latest District Marathi News Raj22b01134 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top