मोटारसायकल चोरणाऱ्या दोन टोळ्या जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोटारसायकल चोरणाऱ्या दोन टोळ्या जेरबंद
मोटारसायकल चोरणाऱ्या दोन टोळ्या जेरबंद

मोटारसायकल चोरणाऱ्या दोन टोळ्या जेरबंद

sakal_logo
By

राजगुरुनगर, ता. ९ : खेड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने, उत्तर पुणे जिल्ह्यात मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन टोळ्या जेरबंद केल्या असून चोरट्यांकडून एकूण १७ मोटारसायकल हस्तगत केल्या. एकूण १२ गुन्हे शोध पथकाने उघडकीस आणले.
गेल्या आठवड्यात खेड गुन्हे शोध पथकाने एका टोळीचा पर्दाफाश करून ३ आरोपींना अटक केली व त्यांच्याकडून ८ मोटारसायकल जप्त केल्या. या टोळीने मंचर, नारायणगाव, आळेफाटा येथे केलेले मोटारसायकल चोरीचे ५ गुन्हे उघडकीस आणले. दिनेश दिलीप दुधावडे (रा. घारगाव ता. संगमनेर जि. नगर), भाऊ पांडुरंग मेंगाळ (सध्या रा. थोरांदळे ता. आंबेगाव, मूळ रा. मुक्ताई ढाब्याजवळ, नारायणगाव, ता. जुन्नर), विजय गुलाब सावंत (रा. चौदा नंबर, कांदळी ता. जुन्नर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
या आठवड्यात लगेचच दुसऱ्या मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा छडा लावला. त्यांच्याकडून ९ मोटारसायकल जप्त करून राजगुरुनगर, शिक्रापूर, चाकण, आळंदी, वडगाव मावळ व इतर ठिकाणी केलेले एकूण ७ गुन्हे उघडकीस आणले. नीलेश देविदास वाकचौरे, गणेश साहेबराव पडवळ, गणेश रमेश काकडे, सचिन बाळासाहेब विकणे (सर्व रा. पेठ, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे या टोळीतील संशयित आरोपी आहेत.
सदरच्या दोन्ही कारवाया पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे फौजदार भारत भोसले, अंमलदार संतोष घोलप, सचिन जतकर, निखिल गिरीगोसावी, स्वप्नील गाढवे, प्रवीण गेंगजे, होमगार्ड विजय होले, नंदू होले, अतिश शिंदे यांनी पार पाडल्या.

Web Title: Todays Latest District Marathi News Raj22b01135 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top