
बिबट्यामुळे नागरिक हैराण
जऊळके परिसरात अनेकदा बिबटे लोकांच्या नजरेस पडत होते. उन्हाळी बाजरीच्या शेतात आणि स्प्रिंकलरच्या पाण्याखालीही लोकांना ते दिसले होते. पण, माणसांवर त्यांनी कधी हल्ला केला नव्हता. आता हल्ला झाल्याने गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
- योगेश बोऱ्हाडे, माजी सरपंच, जऊळके (ता. खेड)
या सलग हल्ल्यांमुळे बिबटे हिंसक झाल्याचे दिसत असून साधारणतः ते रेटवडी, टाकळकरवाडी, जऊळके, ढोरे भांबुरेवाडी या परिसरातील रानांमध्ये आणि शेतांमध्ये फिरत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये जबरदस्त घबराट आहे. त्यामुळे वन विभागाने त्यांच्या कारवाईची व्याप्ती वाढवून लोकांना दिलासा द्यावा.
- कैलास टाकळकर
या परिसरातील बिबट्यांच्या उपद्रवाबाबत उपाययोजना करण्यासाठी राजगुरुनगर वनविभाग व जुन्नर वनविभागाच्या माणिकडोह येथील पथकाने या परिसरात कसून शोध घेतला. त्यांच्या शोधासाठी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. तसेच, बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी नऊ ठिकाणी पिंजरे लावले. तरीही बिबटे त्यात सापडत नाहीत. त्यांच्या शोधासाठी सॅटेलाईट मॅपिंग करण्यात येत असून, एका बिबट मादीचा छडा लागत आहे. उन्हाळ्यामुळे बिबटे सैरभैर झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे.
- प्रदीप रौंधळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, राजगुरुनगर वन विभाग
Web Title: Todays Latest District Marathi News Raj22b01138 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..