आईच्या हिश्श्याचे पैसे मागणाऱ्या भाच्याचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आईच्या हिश्श्याचे पैसे मागणाऱ्या भाच्याचा खून
आईच्या हिश्श्याचे पैसे मागणाऱ्या भाच्याचा खून

आईच्या हिश्श्याचे पैसे मागणाऱ्या भाच्याचा खून

sakal_logo
By

राजगुरुनगर, ता. १२ : पुणे-नाशिक महामार्गाच्या बाह्यवळणात गेलेल्या जमिनीचे आईच्या हिश्श्याचे पैसे मागत असल्याच्या कारणावरून मामा, मामेभाऊ व मावसभावाने तरुणाचा दगडाने व स्टील रॉडने घाव घालून खून केला.
खेड तालुक्यातील निमगावच्या एसईझेडच्या खेड सिटीजवळ पाबळ रस्त्यालगत शनिवारी रात्री हा खून झाला. अशोक बाळू भालेराव (वय २५, रा. कवळा ठाकरवाडी, निमगाव, ता. खेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी खेड पोलिसांनी चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. शांताराम दगडू शिंदे, विशाल शांताराम शिंदे, सुनील शांताराम शिंदे व सुभाष काळे (सर्व रा. रेटवडी, ता. खेड), अशी संशयित आरोपींची
नावे आहेत.
खेडचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता बाळू भालेराव (रा. कवळा ठाकरवाडी, निमगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शांताराम दगडू शिंदे, संपत दगडू शिंदे, मनीषा काळे व मृताची आई कमल भालेराव, हे चौघेजण सख्खे बहिणभाऊ असून, त्यांच्या नावे माळेगाव (ता. खेड) येथे शेती आहे. त्यापैकी काही शेती पुणे-नाशिक महामार्गाच्या बाह्यवळणात गेली. त्याचे पैसे मामा शांताराम दगडू शिंदे याच्याकडे आले, पण ते आईला मिळाले नाहीत, म्हणून अशोक भालेराव हा वाद घालून आईच्या वाट्याचे पैसे मागत होता. त्यातून काही दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडणेही झाली होती. ही भांडणे मिटविण्यासाठी शनिवारी रात्री अशोक व सुनील शिंदे हे भेटले. चर्चा झाल्यानंतर अशोक हा सुनील शिंदे यासोबत खेड सिटीलगत पाबळ रस्त्यापर्यंत गेला. त्यावेळी तिथे असलेल्या शांताराम शिंदे, सुनील शिंदे, विशाल शिंदे व सुभाष काळे यांनी शेतजमिनीचे पैसे मागतो म्हणून अशोक याचा स्टील रॉडने व दगडाने घाव घालून खून केला व ते फरारी झाले. खेड पोलिसांच्या पथकाने त्यांना एका दिवसात अटक केली. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक नवनाथ रानगट हे तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Raj22b01168 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top