राजगुरुनगरमध्ये इकडची नावे तिकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजगुरुनगरमध्ये इकडची नावे तिकडे
राजगुरुनगरमध्ये इकडची नावे तिकडे

राजगुरुनगरमध्ये इकडची नावे तिकडे

sakal_logo
By

राजगुरूनगर, ता. २७ : राजगुरूनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारूप मतदार यादीत प्रचंड घोळ असून, नगरपरिषदेकडे सुमारे ८०० हरकती दाखल झाल्या आहेत. यादी करताना बीएलओंनी पैसे खाऊन इकडची नावे तिकडे केली आहेत आणि बाहेरगावची नावे घुसडली आहेत, अशा थेट तक्रारी कार्यकर्ते करीत होते.
नगरपरिषदेची प्रारूप मतदार यादी गेल्या सोमवारी प्रसिद्ध झाली. सोमवारी (ता. २७) हरकती घेण्याचा शेवटचा दिवस होता. सुमारे ८०० हरकती दाखल झाल्या. पण, त्यापेक्षा खूप अधिक गडबडी यादीत झालेल्या आहेत. गठ्ठ्याने मतदारांची नावे बदलली आहेत व गठ्ठ्याने नावे घुसडली आहेत. सामान्य मतदारांना याचा पत्ताच नसल्याने तो गाफील आहे. काही लोकांनी आपल्या हितसंबंधांकरिता बीएलओंना हाताशी धरून जाणीवपूर्वक हे बदल केले असल्याने भ्रष्ट बीएलओंवर चौकशी लावून कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर यांनी केली.
यादीत घोळ झाल्याबद्दल हरकती घेणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र प्रशासनाच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. हरकतींबाबत पुरावे आणले तरच हरकती घेऊ, असे सांगण्यात येत होते. आता बोगस मतदाराच्या रहिवासाचा पुरावा कोठून आणायचा, हा कार्यकर्त्यांपुढे प्रश्न होता. बीएलओंनी पुरावा पाहून मतदार समाविष्ट करायला पाहिजे होते, पण तसे झाले नाही. दोष बीएलओंचा आणि पुरावे गोळा करायचे हरकतदारांनी, असा अजब न्याय पाहायला मिळाला.
कळस म्हणजे नगरपरिषद असलेल्या नेहरू चौकातील सुमारे दोनशे मतदार तेथून दूर असलेल्या दुसऱ्या वॉर्डात टाकले. यादीच्या पानावर नेहरू चौकाचा स्पष्ट उल्लेख आहे, तरी तक्रार घेता येणार नाही, असे सांगितले जात होते. पिढ्यानपिढ्या राहत असलेल्या घरातील मतदार त्या प्रभागात न ठेवता, दुसरीकडे टाकण्याचे प्रकार घडलेत. अशा बीएलओंवर कारवाई करण्याची जोरदार मागणी आता होत आहे.

आलेल्या हरकतींचे पंचनामे करून त्याबाबत निर्णय घेऊ. हरकती आल्या नसलेल्या, पण चुकीची नावे लागलेल्या मतदारांबाबत काही करू शकत नाही.
- निवेदिता घारगे, मुख्याधिकारी

Web Title: Todays Latest District Marathi News Raj22b01187 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..