हिंदुत्ववादी संघटनांचा राजगुरुनगरमध्ये मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदुत्ववादी संघटनांचा राजगुरुनगरमध्ये मोर्चा
हिंदुत्ववादी संघटनांचा राजगुरुनगरमध्ये मोर्चा

हिंदुत्ववादी संघटनांचा राजगुरुनगरमध्ये मोर्चा

sakal_logo
By

राजगुरुनगर, ता. २ : महाराष्ट्रातील अमरावतीचे उमेश कोल्हे यांची व राजस्थानातील उदयपूर येथील कन्हैयालाल यांची धर्मांधाकडून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून येथे शनिवारी संध्याकाळी मोर्चा काढण्यात आला, तसेच मारेकऱ्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला. निषेध मोर्चा एस. टी. स्थानक ते डॉ. हेडगेवार चौकापर्यंत काढण्यात आला. त्यावेळी केलेल्या भाषणात अशोक यलमार म्हणाले, ‘ भारतात जिहादी मानसिकता वाढीस लागली असून देशभर दंगली घडविण्याची कटकारस्थाने केली जात आहेत. हिंदू काश्मीरमध्ये प्रवेश करू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे.’ या वेळी रमेश कोबल, समीर थिगळे, बापूसाहेब थिटे आदींची भाषणे झाली. प्रतीक दौंडकर यांनी सूत्रसंचालन केले. तर संतोष खामकर यांनी निषेध मोर्चाचा समारोप केला.

Web Title: Todays Latest District Marathi News Raj22b01194 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top