तीन अपत्ये असल्यामुळे गमावले सोसायटीचे पद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

  Elecation
तीन अपत्ये असल्यामुळे गमावले सोसायटीचे पद

तीन अपत्ये असल्यामुळे गमावले सोसायटीचे पद

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक व नुकतीच अध्यक्षपदी निवड झालेले जयसिंग पाटोळे यांना तीन अपत्ये असल्याच्या कारणावरून अपात्र ठरविण्यात आले आहे. खेडचे सहायक निबंधक हरिश्चंद्र कांबळे यांनी हा निर्णय दिला.
सोसायटीचे सभासद सीताराम नेहेरे व दुर्वेश पाटोळे यांनी यासंदर्भात सहायक निबंधक हरिश्चंद्र कांबळे यांच्याकडे तक्रार केली होती.

पाटोळे हे चार महिन्यांपूर्वी झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत निवडून आले. त्यानंतर त्यांना सोसायटीचे अध्यक्षही करण्यात आले. मात्र, त्यांना तीन अपत्ये असल्याने संचालक म्हणून राहण्यास अपात्र करावे, अशी तक्रार केली होती. त्यानंतर सहायक निबंधक कांबळे यांच्यासमोर सुनावण्या सुरू होत्या. तक्रारदारांनी आपले म्हणणे आणि तीनही मुलांचे शाळांचे दाखले सादर केले. त्यावर पाटोळे यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास अनेकदा संधी दिली. हे दाखले बनावट असल्याचा दावा त्यांच्यावतीने करण्यात आला, पण त्याच्या पुष्ट्यर्थ ते काही सादर करू शकले नाहीत. त्यामुळे कांबळे यांनी पाटोळे यांना ७ सप्टेंबर २००२ नंतर दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यामुळे ते सोसायटीचे संचालक म्हणून अपात्र आहेत आणि त्यांची जागा रिक्त झाली आहे, असे घोषित केले.