सायकल रॅलीत ३५० सायकलस्वारांचा सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायकल रॅलीत ३५० सायकलस्वारांचा सहभाग
सायकल रॅलीत ३५० सायकलस्वारांचा सहभाग

सायकल रॅलीत ३५० सायकलस्वारांचा सहभाग

sakal_logo
By

राजगुरूनगर, ता. २३ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि हुतात्मा राजगुरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून, येथील हुतात्मा राजगुरू सायकलिस्ट क्लबच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी भव्य सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये सुमारे ३५० हून अधिक सायकलस्वार सहभागी झाले. यामध्ये सुमारे ६० महिला आणि १०० हून अधिक विद्यार्थ्यांची संख्या होती.
राजगुरुनगर येथे सकाळी ७ वाजता राष्ट्रगीताने एस.टी. बस स्थानकासमोरील हुतात्मा राजगुरू स्मृतीशिल्पांना अभिवादन करून बाबाजी काळे, गणेश थिगळे, जीवन कोकणे, राहुल सस्ते आदी मान्यवरांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. रॅली वाडा रस्त्याने ९ किलोमीटरवरील चास गावी पोहचली. तेथे लायन्स क्लबच्यावतीने केळी, चिक्की, पाणी आणि फ्रुटी असा हलका आहार सायकलस्वारांना देण्यात आला. चासवरून भीमा नदीचा पूल ओलांडून रॅली कडूस येथे गेली.
कडूस येथील डायनॅमिक इंग्लिश मिडीयम स्कूल या ठिकाणी रॅलीने थांबा घेतला. तेथे एक लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यामध्ये पाच हेल्मेट्स सायकलस्वारांनी जिंकली. कडूसवरून रॅली पुन्हा राजगुरुनगरमध्ये आली आणि वेशीतून बाजारपेठमार्गे हुतात्मा राजगुरूंच्या वाड्यावर येऊन थांबली.
यावेळी अतुल देशमुख, राहुल आढारी, सुभाष वाजे, विजय गव्हाणे, सागर पाटोळे, डॉ. भूषण साळी आदी उपस्थित होते. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींच्या सत्कार करण्यात आले. क्लबचे अध्यक्ष नीलेश काळे यांनी आभार मानले.

सायकलस्वारांना मेडल, प्रमाणपत्रे
वाड्यावर सायकलस्वारांना मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतर लकी ड्रॉ काढण्यात आला. सर्वप्रथम महेंद्र जोरे यांनी दिलेल्या सायकलचा महिलांसाठी विशेष लकी ड्रॉ घेण्यात आला. त्यानंतर वैभव घुमटकर यांनी दिलेल्या १५ ट्रॅकसूट व आयोजकांकडून मिळालेल्या हेल्मेटसचा लकी ड्रॉ काढण्यात आला. तसेच राजगुरूनगर सहकारी बँकचे सहकार पॅनेल, लादवड सायकल क्लब आणि मोरया सायकल्स यांच्याकडून मिळालेल्या सायकलींचा लकी ड्रॉ काढण्यात आला.

02019

Web Title: Todays Latest District Marathi News Raj22b01241 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..