कारवाईच्या मागणीसाठी टाव्हरे यांचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारवाईच्या मागणीसाठी 
टाव्हरे यांचे आंदोलन
कारवाईच्या मागणीसाठी टाव्हरे यांचे आंदोलन

कारवाईच्या मागणीसाठी टाव्हरे यांचे आंदोलन

sakal_logo
By

राजगुरुनगर, ता. २९ : खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांची चौकशी करून कारवाई करण्याच्या आश्वासनाची पूर्तता व्हावी, या व अन्य मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक टाव्हरे यांनी येथील खेड उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (ता. २९) एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.
खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले असल्याचे निदर्शनास येऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप करीत टाव्हरे यांनी आझाद मैदानावर मार्च महिन्यात धरणे आंदोलन केले होते. तसेच, कनेरसरच्या पोलिस पाटलांचा जुगार खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होऊनही त्यांच्यावर कारवाई होत नाही, असे त्यांचे आक्षेप होते. त्यावेळी पोलिस पाटलावर कारवाईसाठी खेडचे प्रांत यांना चौकशी अहवाल सादर करण्याचे व पोलिस निरीक्षक यांच्याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी अहवाल सादर करण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले होते.
उपोषणादरम्यान खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी टाव्हरेयांच्याशी चर्चा केली. याप्रकरणी पोलिस अधीक्षक देशमुख यांना अहवाल पाठविला आहे. त्यावर ते जो आदेश देतील, त्यानुसार कारवाई होईल, असे पत्र त्यांनी टाव्हरे यांना दिले. टाव्हरे यांच्या मागण्यांबाबत आमच्या पातळीवरील कार्यवाही आम्ही केलेली आहे. त्याची माहिती त्यांना नव्हती, ती आज दिली. पुढील गोष्टींसाठी त्यांना वरिष्ठांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे, असे पाटील यांनी सांगितले.
सहा महिन्यात कोणतीही कारवाई नाही व शासन आदेशानुसार कार्यवाही कळविली नाही, यासाठी पोलिस प्रशासनाचा निषेध म्हणून लाक्षणिक उपोषण केल्याचे टाव्हरे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Raj22b01250 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..