राष्ट्रवादी युवकचे महागाई विरोधात आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादी युवकचे महागाई विरोधात आंदोलन
राष्ट्रवादी युवकचे महागाई विरोधात आंदोलन

राष्ट्रवादी युवकचे महागाई विरोधात आंदोलन

sakal_logo
By

राजगुरूनगर, ता. १ : येथील पुणे-नाशिक महामार्गावर हुतात्मा राजगुरू, भगतसिंग व सुखदेव स्मृतिशिल्पासमोर, खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निदर्शने करीत महागाई विरोधात आज (ता. १) संध्याकाळी आंदोलन केले. ''५० खोके, महागाई एकदम ओके'' अशा घोषणा लिहिलेले फलक आणि तशाच घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले.
आमदार दिलीप मोहिते, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले, तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर व युवक अध्यक्ष जयसिंग दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आक्रमक होत केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ''मोदी तेरे राज में, कटोरा आया हात में'', ''जनता भरते जीएसटी, गद्दार जातात गुवाहाटी'', ''महागाई कशासाठी, आमदारांच्या खरेदीसाठी'', अशा घोषणा कार्यकर्ते देत होते.

देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर लागू केलेल्या करांमुळे त्यांच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. मात्र सरकारला लोकांच्या जगण्याशी घेणे-देणे नाही. देश चालविणे बाजूला ठेवून फक्त गैरमार्गाने सत्ता मिळविण्यासाठी सत्ताधारी काम करीत आहेत, असे दरेकर म्हणाले. या वेळी जयसिंग दरेकर, रवींद्र गाढवे व सौरव गव्हाणे यांची भाषणे झाली.

यावेळी राजगुरुनगर शहर अध्यक्ष सागर सातकर, कैलास लिंभोरे, इजाज तांबोळी, प्रमोद शिंदे, पंकज दौंडकर, महेश होले, रवींद्र पाचारणे, चेतन शिंदे, अमोल पानमंद, रवींद्र गायकवाड, उमेश गाडे, किरण पवार, मित्रसेन डोंगरे, वैभव घुमटकर, बाळासाहेब अरगडे, दत्तात्रेय मोरे, शरद वाडेकर, संदीप बधाले, सागर दिवसे, तुषार राक्षे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक उमेश गाडे यांनी केले. आभार सागर सातकर यांनी मानले.

02049

Web Title: Todays Latest District Marathi News Raj22b01256 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..