राजगुरुनगर येथे दोन तरुण ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजगुरुनगर येथे
दोन तरुण ठार
राजगुरुनगर येथे दोन तरुण ठार

राजगुरुनगर येथे दोन तरुण ठार

sakal_logo
By

राजगुरुनगर, ता. २ : पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर (ता. खेड) येथील शासकीय विश्रामगृहाजवळ शुक्रवारी (ता. २) संध्याकाळी चारच्या सुमारास रुग्णवाहिका आणि दुचाकीच्या धडकेत दोन तरुण ठार झाले. आतिश नंदकिशोर सोमवंशी (वय २२, रा. दोंदे, ता. खेड) व मयूर अशोक पवळे (वय २३, रा. चांडोली, ता. खेड) अशी त्यांची नावे आहेत.
मंचर उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका (क्र. एमएच १४ सीएल १२७५) घेऊन चालक महेश चंद्रकांत वालकोळी (रा. बोरघर, ता. आंबेगाव) हा एक रुग्ण व नातेवाईक आणि डॉ. लीला शिंदे यांना घेऊन पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात चालला होता. त्यावेळी राजगुरूनगरकडून भरधाव जाणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकी लांबवर फरफटत गेली. त्यामुळे दुचाकीवरील दोन्ही तरुण रस्त्यावर आपटून गंभीर जखमी झाले व मृत्युमुखी पडले. रुग्णवाहिका चालक वालकोळी व डॉ. लीला शिंदे या किरकोळ जखमी झाल्या.

Web Title: Todays Latest District Marathi News Raj22b01258 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..