सातकरस्थळच्या माजी सरपंचांकडून ७५० जनावरांचे स्वखर्चाने लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातकरस्थळच्या माजी सरपंचांकडून ७५० जनावरांचे स्वखर्चाने लसीकरण
सातकरस्थळच्या माजी सरपंचांकडून ७५० जनावरांचे स्वखर्चाने लसीकरण

सातकरस्थळच्या माजी सरपंचांकडून ७५० जनावरांचे स्वखर्चाने लसीकरण

sakal_logo
By

राजगुरुनगर, ता. १२ : सातकरस्थळचे माजी सरपंच अजय चव्हाण यांनी सांडभोरवाडीतील (ता. खेड) बहुतांश सुमारे ७५० जनावरांचे स्वखर्चाने लंपी रोगविरोधी लसीकरण केले.
लंपी हा साथरोग वेगाने तालुक्याच्या ग्रामीण भागात पसरत आहे. तालुक्यात काही जनावरांना लागण झाल्याचे कळताच चव्हाण यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चातून सांडभोरवाडी, आरुडेवाडी व पाचारणेवाडीतील बहुतांश जनावरांचे लसीकरण केले.
डॉ. स्वप्नील पाडेकर, संभाजी तांबे आणि प्रशांत शेळके यांनी लसीकरण केले. त्यांना सचिन आरुडे, कालिदास सातकर, नानाभाऊ आरुडे, धोंडिभाऊ आरुडे, रामदास पाचारणे, संतोष पाचारणे, सुभाष करमारे, श्याम सांडभोर यांनी लसीकरण करण्यास सहकार्य केले.

लंपी हा जीवघेणा आजार जनावरांमध्ये वाढत आहे. तालुक्यात १८ जनावरांना त्याची लागण झाली आहे. त्यांच्यापासून ५ किलोमीटर परिसरातील जनावरांना धोका असल्याने पशुसंवर्धन विभागाने त्या परिसरातील जनावरांचे लसीकरण आधी हाती घेतले आहे. दरम्यान, सरकारवर अवलंबून न राहता तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी गावोगावी लसीकरणाचे कॅम्प आयोजित करावेत असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.


02072

Web Title: Todays Latest District Marathi News Raj22b01268 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..