‘राष्ट्रभक्त युवक हीच देशाची शक्ती’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘राष्ट्रभक्त युवक हीच देशाची शक्ती’
‘राष्ट्रभक्त युवक हीच देशाची शक्ती’

‘राष्ट्रभक्त युवक हीच देशाची शक्ती’

sakal_logo
By

राजगुरुनगर, ता. १३ : ‘इंटरनेटच्या आभासी आणि मनोरंजक जगात युवकांनी वास्तवाचे भान हरवू देऊ नये, राष्ट्रभक्त युवक हीच देशाची शक्ती असते, अशा युवकांनी नवभारताच्या निर्मितीसाठी स्वतःला सिद्ध करावे,’ असे आवाहन ॲड. राजमाला बुट्टे पाटील यांनी केले.

हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात लायन्स क्लबच्या वतीने आयोजित सायकल वाटपाच्या कार्यक्रमात ''युवकांपुढील संधी आणि आव्हाने'' या विषयावर त्या बोलत होत्या.

या प्रसंगी लायन्स क्लबच्या अध्यक्षा वृषाली गानू, अशोक मेस्त्री, रोहिणी नागवलकर, के. पी. वाकचौरे, अक्षता कान्हूरकर, प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे, प्रा. व्ही. बी. दौंडकर, प्रबंधक कैलास पाचारणे उपस्थित होते. 

बुट्टे पाटील पुढे म्हणाल्या की, युवकांनी विचारांची व जगण्याची समृद्धता अनुभवावी, संस्कार व संस्कृतीचा अभिमान ठेवावा आणि व्यसनांपासून दूर राहावे.

  परस्पर सहकार्य व मानवतेच्या सेवाभावी कार्यासाठी लायन्स क्लब काम करत असल्याचे अध्यक्षा वृषाली गानू यांनी आपल्या मनोगतात सांगितले. 

याप्रसंगी लायन्स क्लबच्या सौजन्याने पाच गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. कोरोना पीडित विधवा महिलांना राजगुरुनगर लायन्स क्लबच्या वतीने साड्या व ॲड. राजमाला बुट्टे पाटील यांच्या वतीने दिवाळी फराळ व फटाक्यांचे साहित्य देण्यात आले. 
----------------