चालकाचे बालिकेशी लैंगिक गैरवर्तन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चालकाचे बालिकेशी लैंगिक गैरवर्तन
चालकाचे बालिकेशी लैंगिक गैरवर्तन

चालकाचे बालिकेशी लैंगिक गैरवर्तन

sakal_logo
By

राजगुरुनगर, ता. १४ : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या मोटार चालकाने खेड तालुक्यातील एका गावातील पाच वर्षीय बालिकेशी लैंगिक गैरवर्तन केल्याची घटना उघडकीस आली. संशयित आरोपीस खेड पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी मोटारीतून शालेय मुलांना खासगी शाळेत ने-आण करण्याचे काम करतो. तो शनिवारी पीडित बालिकेला घरी सोडविण्यासाठी जात होता. त्यावेळी त्याने रस्त्यात मोटार थांबवून पीडित मुलीसोबत लैंगिक गैरवर्तन केले. त्यानंतर, ‘याबाबत घरी कुणाला सांगायचे नाही,’ असे पीडितेला धमकावले. मात्र, मुलीने घरी आल्यानंतर आईवडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर वडिलांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.