ग्राम विकासासाठी महाविद्यालयातून प्रयत्न व्हावा : बवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्राम विकासासाठी महाविद्यालयातून प्रयत्न व्हावा : बवले
ग्राम विकासासाठी महाविद्यालयातून प्रयत्न व्हावा : बवले

ग्राम विकासासाठी महाविद्यालयातून प्रयत्न व्हावा : बवले

sakal_logo
By

राजगुरुनगर, ता. २४ : ‘‘शाश्वत ग्राम विकासासाठी महाविद्यालयीन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.’’ असे प्रतिपादन डॉ. धनंजयराव गाडगीळ शाश्वत ग्राम विकास केंद्राचे समन्वयक डॉ. कैलास बवले यांनी व्यक्त केले.
पुणे येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ शाश्वत ग्राम विकास केंद्र आणि येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नॉलेज-कॉलेज-व्हिलेज सहयोग योजना’ या विषयावरील कार्यशाळा हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी डॉ. सुमंत पांडे, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संचालक सतीश नाईकरे, गुळाणीच्या सरपंच इंदुबाई ढेरंगे, उपसरपंच अनिता शिंगारे, ज्ञानेश्वर ढेरंगे, छाया आरुडे, अशोक आरूडे, सुभाष पिंगळे, प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे उपस्थित होते. 
  डॉ. बवले म्हणाले, ‘उपलब्ध असणाऱ्या संसाधनांचा वापर करून ग्रामीण भागाचा शाश्वत विकास करण्याचा आराखडा तयार करणे गरजेचे आहे. महाविद्यालयांनी आपापल्या तालुक्याची डेटा बँक तयार करावी.’
डॉ. पांडे म्हणाले, ग्रामीण शाश्वत विकासासाठी निवडलेल्या गावातील मातीचे परीक्षण करणे, वॉटर बजेट, पाणीदार गाव, शिक्षण, आरोग्याच्या सुविधा इत्यादी विविध विषयांवर काम करणे आवश्यक आहे. सूत्रसंचालन डॉ. गणेश धुमाळ यांनी केले, तर आभार डॉ. प्रभाकर जगताप यांनी मानले.