
सिद्धेश्वर स्वाभिमानी सहकार पॅनेलचे वर्चस्व
राजगुरुनगर, ता. १३ : पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील तीनही कंपन्यांतील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेची, सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेवर श्री सिद्धेश्वर स्वाभिमानी सहकार विकास पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले. या पॅनेलने विरोधातील श्री सिद्धिविनायक विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन यांचा १३ विरुद्ध ० असा धुव्वा उडवला.
महाराष्ट्रातील सर्व वीज कर्मचाऱ्यांचे या पतसंस्थेच्या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले होते. विजयी पॅनेलने तांत्रिक कामगार युनियन ५०५९ या संघटनेच्या आधिपत्याखाली निवडणूक लढविली. संघटनेचे अध्यक्ष दिलीप कोरडे, सरचिटणीस प्रभाकर लहाने व उपसरचिटणीस शिवाजी शिवणेचारी यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने हे अभूतपूर्व यश मिळविले.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :- शरद डगळे, शिवाजी शिवणेचारी, प्रवीण घनवट, सूर्यकांत सांडभोर, संतोष लांडे, विजय बनकर, अजित दजगुडे, राधाकृष्ण होंडे, महेश पाटील, छाया मुंढे, सविता शिंदे, दत्तात्रेय बुर्डे, दिलीप सोळंके.
02369