क्रिकेट स्पर्धेत खेड पंचायत समितीची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिकेट स्पर्धेत खेड पंचायत समितीची बाजी
क्रिकेट स्पर्धेत खेड पंचायत समितीची बाजी

क्रिकेट स्पर्धेत खेड पंचायत समितीची बाजी

sakal_logo
By

राजगुरुनगर, ता. १४ : येथे (ता. खेड) रविवारी (ता. १२) क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत खेड पंचायत समितीच्या संघाने अंतिम सामन्या जिंकून प्रथम क्रमांक पटकविला तर खेड महसूल विभागाला उपविजेते पद मिळाले. स्पर्धेचे खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजन केले होते.

महसूल विभाग खेड, पंचायत समिती खेड, खेड पोलिस ठाणे, राजगुरुनगर नगरपरिषद व खेड तालुका पत्रकार संघ यांच्यामध्ये मर्यादित षटकांचे सामने पार पडले. यामध्ये तृतीय क्रमांक खेड पोलिस ठाण्याने तर चतुर्थ क्रमांक खेड पत्रकार संघाने पटकावला. राजगुरुनगर परिषदेला मात्र पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेचे उद्घाटन खेड विभागाचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण याच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी खेड पोलिस ठाण्याचे राजकुमार केंद्रे, उपजिल्हाधिकारी हरेश सुळ, नायब तहसीलदार मदन जोगदंड, गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे, नगर परिषद लेखा अधिकारी विकास वाघमारे, खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर, ज्येष्ठ पत्रकार एकनाथ सांडभोर पी.एस. आय भारत भोसले, पत्रकार वनिता कोरे, पोलिस हवालदार संतोष घोलप, माजी अध्यक्ष महेंद्र शिंदे, उपाध्यक्ष रामचंद्र सोनवणे. सचिव किरण खुडे, माजी अध्यक्ष राजेंद्र लोथे, कार्याध्यक्ष संजय शेटे आदी मान्यवर व खेळाडूंच्या उपस्थित पार पडले.


02371