खेड पोलिस ठाण्यात
फिर्यादीवर कटरने वार

खेड पोलिस ठाण्यात फिर्यादीवर कटरने वार

राजगुरुनगर, ता. १४ : खेड पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास आलेल्या फिर्यादीच्या गळ्यावर संशयित आरोपीने कटरने वार केल्याची घटना मंगळवारी (ता. १४) घडली. क्षितिज बाबासाहेब धाडगे (वय ३०, रा. दोंदे, ता. खेड) असे जखमीचे नाव आहे.
धाडगे यांनी आपली इलेक्ट्रीक स्कूटर रस्त्याच्या कडेला उभी केली आणि एका व्यक्तीला विचारपूस करण्यासाठी गेला. तेवढ्यात संशयित आरोपीच्या मुलाने स्कूटरचा ॲक्सिलेटर पिळला. त्यामुळे स्कूटर खाली पडली. त्याबाबत फिर्यादीने मुलाला विचारणा करताच मुलाचे आईवडील भांडण्यास आले आणि त्या तिघांमध्ये मारामारी झाली. त्यानंतर तिघेही वेगवेगळ्या वाहनांवरून खेड पोलिस ठाण्यात आले. पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन दोघांना ठाण्याच्या एका खोलीत बसवून ठेवले होते. दरम्यान, संशयित आरोपीने अचानक कटर काढले आणि धाडगे यांच्या गळ्यावर वार केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनीच जखमीस खासगी रुग्णालयात हलविले. जखमीवर उपचार सुरू आहेत. मात्र, या प्रकरणी संध्याकाळपर्यंत खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली नव्हती. त्यानंतर पोलिस ठाण्याची संगणक यंत्रणा नादुरुस्त झाल्याने फिर्याद प्रलंबितच राहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com