राजगुरुनगर येथील 
एटीएममधून चोरी

राजगुरुनगर येथील एटीएममधून चोरी

राजगुरुनगर, ता. १५ : येथील शरद सहकारी बँकेच्या एटीएम मशिनमध्ये छेडछाड करून सुमारे सव्वाचार लाख रुपये लांबविल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.
पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरुनगर येथील पुणे-नाशिक महामार्गावरील शिवम कॉम्प्लेक्स या इमारतीत पहिल्या मजल्यावर शरद सहकारी बँकेची शाखा आहे. बँकेचे एटीएम तळमजल्यावर आहे. मंगळवारी रात्री चोरट्यांनी एटीएम मशिनमध्ये छेडछाड करून सव्वाचार लाख रुपये चोरून नेले. सकाळी बँक व्यवस्थापनाच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी रोकड मोजून पाहिली तेव्हा सव्वाचार चार लाख रुपये कमी आढळून आले. सीसीटीव्ही कॅमेरे पाहिल्यावर चोरटे त्यामध्ये दिसून आले. याबाबत बँकेच्या शाखा व्यवस्थापक ज्योती आत्माराम थोरात यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com