अभियंता शिंदे यांचा मृत्यू
दबावामुळेच : पोखरकर

अभियंता शिंदे यांचा मृत्यू दबावामुळेच : पोखरकर

राजगुरुनगर, ता. १६ : खेड पंचायत समितीच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागातील शाखा अभियंता बापूसाहेब शिंदे यांचा मृत्यू हा संशयास्पद असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी
यांच्या दबावामुळे झाल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांनी केला. त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी सरकारकडे करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
तेम्हणाले, ‘‘शिंदे मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, ते बुट्टेवाडीच्या जंगलात जाणे, तेथे ते झोपलेल्या अवस्थेत आढळणे, घरच्यांना त्यांचा ठावठिकाणा माहीत नसणे, आदी गोष्टी संशयास्पद आहेत. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची आमची मागणी आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दबाव आणून चुकीची कामे करून घेतात, त्या दबावाचाच हा बळी आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com