आयडीबीआय बँकेस राजगुरुनगर येथे आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयडीबीआय बँकेस राजगुरुनगर येथे आग
आयडीबीआय बँकेस राजगुरुनगर येथे आग

आयडीबीआय बँकेस राजगुरुनगर येथे आग

sakal_logo
By

राजगुरूनगर,ता. २८ : येथील पाबळरस्त्यावरील आयडीबीआय बँकेच्या शाखेला आग लागल्यामुळे बँकेतील फर्निचर व इलेक्ट्रॉनिक साहित्य जळाल्याची घटना आज (ता. २८) पहाटे घडली. आग लवकर आटोक्यात आली. या इमारतीत वरच्या मजल्यावर रुग्णालय आहे, पण आग आटोक्यात आल्याने दुर्घटना टळली.
पाबळ रस्त्यावरील एका इमारतीत आयडीबीआय बँकेची शाखा आहे. शाखेमध्ये एकूण तीन कर्मचारी आहेत. या शाखेला पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीत तीन संगणक, एक सीसीटीव्ही युनिट, एक प्रिंटर, एक झेरॉक्स मशीन, चार पंखे, फर्निचर, खुर्च्या, लाकडी कपाट, छताचे पीओपी, वायरींग, स्टेशनरी इत्यादी साहित्य जळून खाक झाले. इमारतीतील फक्त आयडीबीआय बँकेच्या शाखेलाच आग लागली. दुसऱ्या दुकानांना व रुग्णालयाला झळ पोहचली नाही.
आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे शाखा व्यवस्थापक प्राजक्ता आरूंदकर यांनी सांगितले. आम्ही लवकरात लवकर शाखा पूर्ववत सुरू करू, असे त्यांनी सांगितले.
02397