राजगुरू महाविद्यालयात भरड धान्य महोत्सव

राजगुरू महाविद्यालयात भरड धान्य महोत्सव

राजगुरुनगर, ता. २ : संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष भरडधान्य वर्ष घोषित केल्याच्या निमित्ताने, येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागाच्या वतीने भरडधान्य महोत्सवाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्‍घाटन खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील यांच्या हस्ते झाले.
या महोत्सवामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी बरोबर वरई, राळ, सावा, मकरा, शामूल, कोद्रा, कुट्टू असे एकूण दहा प्रकारची भरडधान्ये प्रदर्शनात ठेवली होती. विद्यार्थ्यांनी भरड धान्याचा वापर करून बाजरीची बर्फी, ज्वारीचे ताक, कोद्रा पुलाव, राळ्याचे गुलाबजामून, साव्याचा चहा असे ३० वेगवेगळे खाद्यपदार्थ बनविले होते. या उपक्रमात ४३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या प्रसंगी उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, प्राचार्य डॉ. एस. एस. पिंगळे, उपप्राचार्य डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, डॉ. संजय शिंदे, प्रबंधक कैलास पाचरणे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. के. एम. नितनवरे, डॉ. संगीता जे. एस., प्रा. पी. डी. कड, प्रा. आर. व्ही. मेचकर, प्रा. एस. एस. काटकर व विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले. 
Media Ids : RAJ23B02400

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com