राजगुरुनगरमध्ये मजुरावर
अल्पवयीन मुलाकडून वार

राजगुरुनगरमध्ये मजुरावर अल्पवयीन मुलाकडून वार

राजगुरुनगर, ता. १८ : एका मजुरावर अल्पवयीन आरोपीने सुरीने वार करीत जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोमवारी (ता. १७) दुपारी राजगुरुनगर (ता. खेड) येथील न्यायालयाजवळच्या इमारतीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरुनगर येथील एका बांधकाम ठेकेदाराकडे अमोय सरदार (वय ३२, रा. पश्चिम बंगाल) हा कामाला आहे. तो तीन-चार सहकाऱ्यांसह न्यायालयाजवळच्या इमारतीमध्ये एका सदनिकेत राहत आहे. आजारी असल्याने सोमवारी तो घरीच राहिला होता. त्यावेळी अल्पवयीन संशयित आरोपी त्याठिकाणी आला. अज्ञात कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. संशयिताने अमोय याच्यावर धारदार हत्याराने डोळ्यांच्यावर, कपाळावर, हनुवटीवर, मानेवर, उजव्या हाताच्या दंडावर व उजव्या हाताच्या मनगटाच्यावर तसेच डाव्या हाताचे बोटांवर मारहाण करून जबर जखमी केली. जखमीला तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार चालू आहेत. पोलिसांनी अल्पवयीन संशयित आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वर्षाराणी घाटे पुढील तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com