खेडमधील ३४ शाळांचा निकाल १०० टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेडमधील ३४ शाळांचा निकाल १०० टक्के
खेडमधील ३४ शाळांचा निकाल १०० टक्के

खेडमधील ३४ शाळांचा निकाल १०० टक्के

sakal_logo
By

राजगुरुनगर, ता. ३ : खेड तालुक्यातील ३४ शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून, तालुक्याचा एकूण निकाल ९६.५८ टक्के लागल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे यांनी दिली.
तालुक्यातील ८९ शाळांमधून दहावीच्या परीक्षेसाठी ६ हजार ७३४ विद्यार्थी बसले होते. त्यांच्यापैकी ६ हजार ५०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये २११८ विद्यार्थ्यांनी विशेष गुणवता मिळवली असून, २४६९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १५७५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर ३४२ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. फक्त २८० विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण झाले. तालुक्यात ३६५३ मुलांपैकी ३४८९ (९५.७० टक्के) उत्तीर्ण झाले. तर, ३०८१ मुलीपैकी ३००८ मुली (९७.६३ टक्के) उत्तीर्ण झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी कोकणे यांनी दिली.

शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा- रामभाऊ म्हाळगी विद्यालय कडूस, श्री शिवाजी विद्यालय शेलपिंपळगाव, श्री शिंगेश्वर विद्यालय कुडे बुद्रुक, कै. डी. जी. टाकळकर विद्यालय टाकळकरवाडी, श्री शरदचंद्र विद्यालय वडगाव घेनंद, भैरवनाथ विद्यालय वाकी, श्री भामचंद्र माध्यमिक विद्यालय भांबोली, श्री भानोबा विद्यालय कोयाळी, भैरवनाथ विद्यालय किवळे, रेणुका विद्यालय रासे, मॉडर्न हायस्कूल भोसे, इंग्लिश मीडियम स्कूल राजगुरुनगर, आदर्श विद्यालय आंबोली, सरस्वती विद्यालय औदर, भीमाशंकर माध्यमिक विद्यालय आव्हाट, त्रिमूर्ती विद्यालय तिन्हेवाडी, न्यू इंग्लिश स्कूल निमगाव, हनुमान माध्यमिक विद्यालय चिंचोशी, प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूल वाकी खुर्द, पायस मेमोरीयल स्कूल वाकी खुर्द, विद्यानिकेतन सोसायटी खेड, राजमाता जिजाऊ कन्याशाळा तुकाईवाडी, होली एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल वडगाव -घेनंद, डायनॅमिक इंग्लिश स्कूल कडूस, लिटल चॅम्प इंग्लिश मीडियम स्कूल राजगुरुनगर, पोद्दार ब्लॉसम स्कूल रोहकल फाटा, श्री निकेतन गुरुकुल विद्यालय, लर्निंग ट्री इंग्लिश मीडियम वराळे, एस. एन. इंग्लिश स्कूल खेड, नवोन्मेष विद्यालय, प्रियदर्शनी हायस्कूल वाकी खुर्द, अनुसूचित जाती नवबौद्ध निवासी शाळा खेड, श्री स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल शंकरनगर चाकण, चौधरी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल खरपुडी बुद्रुक.

इतर शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे : महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर (९७.५९ टक्के), श्री ज्ञानेश्वर विद्यालय, आळंदी देवाची (९९.६९ टक्के), श्री शिवाजी विद्या मंदिर चाकण (९५.३१ टक्के), महाराजा यशंवतराव होळकर विद्यालय वाफगाव (९४.३६ टक्के), कर्मवीर विद्यालय वाडा (९८.७३ टक्के), जवाहर विद्यालय चास (९८.११ टक्के), श्री सिद्धेश्वर विद्यालय वेताळे (९५.५८ टक्के), श्रीमंत महाराज फत्तेसिंहराव गायकवाड विद्यालय दावडी (९१.८६ टक्के), सुभाष विद्यालय बहुळ (९३.८४ टक्के), कुंडेश्वर विद्यालय पाईट (९१.७५ टक्के), हुतात्मा राजगुरू विद्यालय राजगुरुनगर (९०.९० टक्के), अंबिका विद्यालय कनेरसर (९०.९० टक्के), शिवाजी विद्यालय डेहणे (९४.७३ टक्के), राष्ट्रीय विद्यालय कुरकुंडी (९७.७५ टक्के), सुमंत विद्यालय पिंपरी बुद्रुक (९५.५८ टक्के), भाऊसाहेब राऊत विद्यालय घोटवडी (९४.४४ टक्के), नवीन माध्यमिक विद्यालय मरकळ (९७.८४ टक्के), श्रीपती महाराज माध्यमिक विद्यालय म्हाळुंगे इंगळे (९४.७३ टक्के), शासकीय आश्रमशाळा कोहिंडे बुद्रुक (९४.७३ टक्के), न्यू इंग्लिश स्कूल काळूस (९७.५६ टक्के), मामासाहेब मोहोळ प्रशाला वाशेरे (८५ टक्के), शासकीय आश्रमशाळा टोकावडे (९१.०७ टक्के), भैरवनाथ विद्यालय दोंदे (९६.०५ टक्के), मोहोळ माध्यमिक प्रशाला पाळू (९४.२८ टक्के), माध्यमिक विद्यालय पाडळी- काळेचीवाडी (९३.१८ टक्के), साने गुरुजी विद्यालय खरपुडी बुद्रुक (९१.८९ टक्के), श्रीधरराव वाबळे विद्यालय रेटवडी (९२.०६ टक्के), वसंतराव मांजरे विद्यालय मांजरेवाडी (९६.२९ टक्के), ज्ञानदीप विद्यालय शिवे (८६.६६ टक्के), माध्यमिक विद्याल सायगाव (८४ टक्के), नवमहाराष्ट्र विद्यालय खराबवाडी (९८.६७ टक्के), कन्या विद्यालय चाकण (९२.७२ टक्के), संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय सोळू (८४.७८ टक्के), एल. व्ही. दुराफे विद्यालय आळंदी (८८.०२ टक्के), भैरवनाथ माध्यमिक विद्यालय कुरुळी (९७.५० टक्के), बाबूराव पवार विद्यालय बिरदवडी (९८.५० टक्के), इंदिराजी माध्यमिक विद्यालय मोई (९७.२९ टक्के), न्यू इंग्लिश स्कूल कोहिंडे बुद्रुक (९०.४७ टक्के), मळूदेवी विद्यालय वाळद (९५.३४ टक्के), श्री भैरवनाथ विद्यालय करंजविहिरे (९३.३३ टक्के), आदर्श विद्यालय शिरोली (९४.३३ टक्के), कै. बी. जी.
पी. पाटील विद्यालय गुळाणी (९१.३० टक्के), राजे छत्रपती विद्यालय चांदूस (९३.३३ टक्के), श्री सरस्वती विद्यालय चिंबळी (९५.७१ टक्के), राजे शिवछत्रपती विद्यालय आळंदी (८५.७१ टक्के), आर्यन स्कूल चांडोली (९०.९० टक्के), शासकीय आश्रमशाळा चिखलगाव (८७.०९ टक्के), ज्ञानवर्धिनी विद्यालय आंबेठाण (९९.२८ टक्के), आनंद इंग्लिश मीडियम स्कूल कुरुळी (९६.२२ टक्के), श्री समर्थ माध्यमिक विद्यालय चिंबळी फाटा (९७.३६ टक्के), श्री समर्थ इंग्लिश स्कूल चिंबळी फाटा (९५.९१ टक्के), भामा इंग्लिश मीडियम स्कूल (९१.४२ टक्के), पवनसुत इंग्लिश मीडियम स्कूल मरकळ (९६.१५ टक्के), श्री ज्ञानसाई विद्यालय आळंदी देवाची (९६.२२ टक्के), ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल आळंदी (९५.१२ टक्के).