
पणदरेतील माजी विद्यार्थी हास्य विनोदात रमले
रांजणगाव सांडस, ता. १० ः सरस्वती शिक्षण मंडळ संचलित पणदरे (ता. बारामती) येथील नव महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात तब्बल २७ वर्षांनी दहावीच्या सन १९९४-९५च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच झाला.
तब्बल २७ वर्षानंतर पुन्हा एकत्र येत माजी विद्यार्थ्यांची वर्ग भरविला. यावेळी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ज्या वर्गखोलीत शिक्षण घेतले तेथे पुन्हा बसून तत्कालीन शिक्षकांचे मनोगत ऐकले. ७५ वर्षे वय ओलांडलेल्या या शिक्षकांचा बोलण्यातील स्पष्टपणा पाहून माजी विद्यार्थी हरपले. सर्व जण प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करत होते. शाळेतील जुन्या आठवणी, मजेदार किस्से एकमेकांशी शेअर करत सर्व जण हास्य विनोदात रमले होते.
सरस्वती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष केशवराव जगताप हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी सचिव कल्याणराव जगताप, डॉ. गोविंद कोकरे, के. वाय. जगताप, निवृत्त न्यायाधीश काकासाहेब जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. केशव कारंडे, योगेश शहा, डॉ. चंद्रशेखर टेंगले आदी माजी विद्यार्थ्यांनी व प्राचार्य आर. एच. शिंदे, एच. एल. पवार, आर. के. कदम, माजी प्राचार्य आर. टी. कदम, माजी उपप्राचार्य आत्तार या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.
मेळावा यशस्वितेसाठी प्रशांत कदम, विनायक कदम, सदाशिव कोकरे, मीनल चव्हाण, रामदास भुजबळ, सचिन जगताप, अविनाश कदम, प्रतिभा मुळीक, रूपाली जगताप, वीरेंद्र कोकरे आदींनी परिश्रम घेतले. प्रा. शीतल पवार यांनी प्रस्ताविक तर अविनाश लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. हनुमंत फडके यांनी आभार मानले.
शाळेविषयी अनोखी कृतज्ञता
माजी विद्यार्थ्यांनी माजी शिक्षक आणि मान्यवरांना शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प व आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित केले. तसेच विद्यालयाला स्कॅनर, प्रिंटर झेरॉक्स अशी थ्री इन वन मशिन भेट दिली. स्पर्धा परीक्षेच्या केंद्रासाठी पुस्तके भेट देण्याची घोषणा केली. तसेच शाळेतील माजी विद्यार्थी जे विविध क्षेत्रात तज्ज्ञ आहेत अशा व्यक्तींनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्याची घोषणा करून अनोखी कृतज्ञता व्यक्त केली.
63298
Web Title: Todays Latest District Marathi News Rjs22b00672 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..