
दहिवडी सोसायटीच्या अध्यक्षपदी अशोक सातकर
रांजणगाव सांडस, ता. १२ : दहिवडी (ता. शिरूर) येथील स्वामी विवेकानंद विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी अशोकराव शंकरराव सातकर यांची तर उपाध्यक्षपदी नानासाहेब बाबदेव कुलाळ यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत स्वामी विवेकानंद शेतकरी सहकारी पॅनेलने सर्वच्या सर्व म्हणजेच १३ जागा जिंकून विरोधी श्री गवळीबाबा शेतकरी सहकारी पॅनेलच्या उमेदवारांचा दारुण पराभव केला. स्वामी विवेकानंद शेतकरी पॅनेलने सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीत तेरा विरुद्ध झिरो (१३-०) असा विजय मिळवला आहे. त्यानंतर अध्यक्ष-उपाध्यक्षांचीही निवडणूक बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के. डी. मोरे व सचिव संतोष सरोदे यांनी काम पाहिले. या प्रसंगी सोसायटीचे माजी अध्यक्ष गणेश कोतवाल, सरपंच सुवर्णा अरुण नेटके, विठ्ठल उकले, नामदेव ढमढेरे, माऊली उकले, दत्तात्रेय सातकर, सुभाष गारगोटे, रामभाऊ नेटके, बाळासाहेब मांजरे, काळूराम पुणेकर आदि उपस्थित होते. निवडणुकीत विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : रमेश सुखदेव उकले, निखिल अर्जुन गारगोटे, विलास तुकाराम दौंडकर, विलास दगडू दौंडकर, मुकुंद दत्तात्रेय भिवरे, अमोल सुभाष मांजरे, सिंधूबाई शिवाजी उकले, केरुबाई सोपान दौंडकर, अरुण शंकर नेटके, एकनाथ यशवंत कोतवाल, संतोष शिवाजी इंगळे.
Web Title: Todays Latest District Marathi News Rjs22b00677 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..