रांजणगाव सांडस सोसायटीवर महिलाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रांजणगाव सांडस सोसायटीवर महिलाराज
रांजणगाव सांडस सोसायटीवर महिलाराज

रांजणगाव सांडस सोसायटीवर महिलाराज

sakal_logo
By

रांजणगाव सांडस, ता. १२ : रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सारिका चिंतामण रणदिवे यांची, तर उपाध्यक्षपदी नीता पांडुरंग रणदिवे यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या १०२ वर्षाच्या इतिहासात प्रथमच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही पदांसाठी महिलेला संधी मिळून सोसायटीवर प्रथमच महिलाराज आले. संस्थेच्या इतिहासात महिलेला अध्यक्षपदाची संधी मिळाली नव्हती.
इतरांना संधी मिळावी म्हणून दादासाहेब कोळपे व महादेव कुंभार यांनी अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर घेण्यात आलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी सारिका रणदिवे यांचा, तर उपाध्यक्षपदासाठी नीता रणदिवे यांचेच एकमेव अर्ज आले. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ए. एच. धायगुडे, सचिव दत्तात्रेय काळभोर यांनी जाहीर केले.
यावेळी रावसाहेबदादा पवार घोडगंगा कारखान्याचे संचालक संतोष रणदिवे, सोसायटीचे माजी अध्यक्ष शरदराव निंबाळकर, जिल्हा दूध संघाचे माजी संचालक जीवन तांबे, बबनदादा रणदिवे, संभाजी रणदिवे, सरपंच उत्तम लोखंडे, सुदामराव रणदिवे, सागर रणदिवे, किरण रणदिवे, गणेश रणदिवे, बाळासाहेब रणदिवे, संदीप शितोळे, मालू शिंदे, अजित रणदिवे, खंडू रणपिसे, जालिंदर लोखंडे, सर्जेराव भोसले, संजय पाटोळे आदी उपस्थित होते.
आमदार अशोक पवार, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक झुंबरअण्णा रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन संस्थेचे कामकाज पारदर्शक व अधिक गतिमान केले जाईल, असे संतोष रणदिवे यांनी या प्रसंगी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Rjs22b00679 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top