उरळगावच्या सरपंचपदी रफिक शेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उरळगावच्या सरपंचपदी रफिक शेख
उरळगावच्या सरपंचपदी रफिक शेख

उरळगावच्या सरपंचपदी रफिक शेख

sakal_logo
By

रांजणगाव सांडस, ता. १ : उरळगाव (ता. शिरूर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रफिक मोहम्मद शेख यांची बिनविरोध निवड झाली. इतरांना उपसरपंचपदाची संधी मिळावी म्हणून स्वाती शशिकांत कोकडे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिला. सरपंच अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहामध्ये उपसरपंचपदाच्या निवडणुकीत शेख यांचाच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी, ग्रामसेवक उद्धव जाधव यांनी जाहीर केले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष भानुदास चव्हाण, भानुदास सात्रस, स्वप्नील गिरमकर, प्रभाकर जांभळकर, कृषी अधिकारी कैलास चव्हाण, दत्तात्रेय गाढवे यांनी मनोगत व्यक्त केले.
शेखलाल शेख, आदमभाई सय्यद, कमाल शेख, ग्रामपंचायत सदस्य शकुंतला काळे, निकिता मोहन सात्रस, लंका सचिन पाचुंदकर, भाग्यश्री अमोल होलगुंडे आदी याप्रसंगी उपस्थित होते. आमदार ॲड. अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काम करणार असल्याचे सरपंच चव्हाण व उपसरपंच शेख यांनी सांगितले.

01615

Web Title: Todays Latest District Marathi News Rjs22b00693 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top