शिरूरच्या पूर्व भागात तापाच्या रुग्णांत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूरच्या पूर्व भागात
तापाच्या रुग्णांत वाढ
शिरूरच्या पूर्व भागात तापाच्या रुग्णांत वाढ

शिरूरच्या पूर्व भागात तापाच्या रुग्णांत वाढ

sakal_logo
By

रांजणगाव सांडस, ता. २ ः शिरूर तालुक्यातील पूर्व भागासह तालुक्यात व जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात तापमानातील तीव्र चढ उतारामुळे विषाणूजन्य आजाराचे प्रमाण वाढत आहे. सर्दी, खोकला, ताप आदी आजारांच्या रुग्णांची संख्या अधिक वाढत आहे. लहान मुलासह ज्येष्ठांनाही ही लक्षणे अधिक दिसत आहेत. एरवीही तीन -चार दिवसात कमी होणारा सर्दी खोकला आठ ते दहा दिवस रुग्णांचा दम काढत आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील रांजणगाव सांडस, आलेगाव पागा, उरळगाव, आरणगाव, दहिवडी, पारोडी आदी गावात गेल्या महिन्याभरात दिवसाच्या तापमानामध्ये किमान २१ ते कमाल ३२ अंश सेल्सिअस इतका चढउतार राहिला आहे. दिवसभर ऊन सावल्यांचा खेळ, त्यामध्ये कधीमधी पावसाच्या सरी पडत आहेत असे गेल्या आठवड्याभराचे चित्र आहे. घामाच्या धारा लागण्या इतपत दिवसभर उकाडा आणि सायंकाळी अधून मधून पाऊस होत आहे.
बदलत्या वातावरणामुळे विषाणूजन्य रोगाच्या संसर्गाचे रुग्ण वाढत आहे. सर्दी, खोकला, ताप थंडी अशी व्हायरल लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे सध्या काही डॉक्टरांची सकाळ संध्याकाळी हाउसफुल ओपीडी झाली आहे.

लहान मुलांसह ज्येष्ठांची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक आहे. व्हायरल लक्षणे दिसणाऱ्यांनी औषधे घेतानाच भरपूर विश्रांती आणि गरम पाणी प्यावे. तळलेले, बाहेरचे पदार्थ खाणे टाळा, मास्क वापरा. नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवण्यास प्राधान्य दिले पाहिजे.
-डॉ. कविता अप्पासाहेब दिवेकर

पुढील काही दिवस गरम पाणी प्या. उघड्यावरील खाद्यपदार्थ घेणे टाळा. तळलेले तेलकट पदार्थ खाणे तूर्तास बंद करा. झोपण्यापूर्वी गरम पाण्याची वाफ घ्या. मुले आजारी असल्यास त्यांना शाळेत पाठवू नका. त्यांना तातडीने डॉक्टरांना दाखवून उपचार सुरू करा. सर्दी खोकला झालेल्या एका मुलाला शाळेत पाठवले तर शाळेत जाता येताना, परिपाठा दरम्यान, शाळेमध्ये जेवताना किंवा इतर मुले एकत्र आल्यास संपर्कात येणाऱ्या सगळ्याच मुलांना सर्दी खोकल्याचा धोका असतो.
-डॉ. नीलिमा विशाल कोकरे.

Web Title: Todays Latest District Marathi News Rjs22b00739 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top