दहिवडीत वृक्ष दत्तक योजनेस प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहिवडीत वृक्ष दत्तक योजनेस प्रतिसाद
दहिवडीत वृक्ष दत्तक योजनेस प्रतिसाद

दहिवडीत वृक्ष दत्तक योजनेस प्रतिसाद

sakal_logo
By

रांजणगाव सांडस, ता.९ : दहिवडी (ता.शिरूर) येथे जलदिंडी प्रतिष्ठानची वृक्ष दत्तक योजना रावसाहेब निचित यांच्या संकल्पनेतून सुरू होऊन १० वर्षे झाली. त्यामुळे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची अहिल्यादेवी शाळा पुणे, जलदिंडी प्रतिष्ठान, शिवराज्य प्रतिष्ठान, जल पर्यावरण समिती, सामाजिक वनीकरण व दहिवडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष दत्तक योजना व महादेव मंदिर परिसरात आणि गावात वृक्षारोपण करण्यात आले. त्यास नागरिकांचा प्रतिसाद लाभला.

वृक्षारोपणाचे महत्त्व व त्याचे पालन पोषण, जलप्रदूषण व दहिवडी पंचक्रोशीतील निसर्गरम्य परिसर या विविध विषयावर मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय सातकर, जलदिंडीचे सचिव रावसाहेब निचित, शिवराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूसाहेब काळे, ग्रामपंचायत सदस्या मंगल उकले, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष रामचंद्र निंबाळकर आदींनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते गणपतराव फराटे, विलासराव दौंडक, ग्रामपंचायत माजी सदस्य रोहिदास साबळे, नानाभाऊ कुलाळ, अहिल्यादेवी शाळेच्या विद्यार्थिनी व जिल्हा परिषद शाळा दहिवडी विद्यार्थी उपस्थित होते. सरपंच सुवर्णा नेटके, पांडुरंग उकले, गोरक्ष काळे, भाऊसाहेब ढमढेरे, विलास दौंडकर, दत्तात्रेय सातकर , अरुणराव नेटके, पंढरीनाथ पवार, मुकुंद भिवरे, नाथा आरू, माऊली उकले, रामभाऊ नेटके, रमेश उकले, सोमनाथ उकले, सुनील कुलाळ, नाना कुलाळ, नामदेव ढमढेरे, संतोष इंगळे आदींनी एक झाड दत्तक घेतले आदींनी वृक्ष दत्तक योजनेत सहभागी झाले होते.
भाजपचे स्वच्छ भारत अभियान समितीचे तालुका अध्यक्ष गोरक्ष काळे यांनी सूत्रसंचालन केले.

01723

Web Title: Todays Latest District Marathi News Rjs22b00741 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..