पवार यांच्या वाढदिवसानिमित्त किर्तन सोहळ्याचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 
किर्तन सोहळ्याचे आयोजन
पवार यांच्या वाढदिवसानिमित्त किर्तन सोहळ्याचे आयोजन

पवार यांच्या वाढदिवसानिमित्त किर्तन सोहळ्याचे आयोजन

sakal_logo
By

रांजणगाव सांडस, ता. २७ : रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथील शिरूर-हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांचा वाढदिवस व अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आमदार अशोक पवार मित्र परिवाराच्या वतीने व समस्त ग्रामस्थ रांजणगाव सांडस यांच्यावतीने महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख-इंदुरीकर यांचे समाज प्रबोधनपर हरी कीर्तन व विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे. हा कीर्तन सोहळा रांजणगाव सांडस विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या प्रांगणात सोमवारी (ता.२९) दुपारी तीन वाजता आयोजित केला असल्याचे संतोष रणदिवे, ज्येष्ठ नेते शरद निंबाळकर, निखिल तांबे यांनी सांगितले. दरम्यान अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दूध उत्पादक सहाशे शेतकऱ्यांसाठी पावर गोठा पशुपालन या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेल्या ॲपचे मोफत वाटपही करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest District Marathi News Rjs22b00749 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..