आरणगावातील घरातून चार तोळे सोने लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरणगावातील घरातून चार तोळे सोने लंपास
आरणगावातील घरातून चार तोळे सोने लंपास

आरणगावातील घरातून चार तोळे सोने लंपास

sakal_logo
By

रांजणगाव सांडस, ता.४ : आरणगाव (ता.शिरूर) येथे अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरात प्रवेश करून घरातील चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत संतोष लक्ष्‍मण जाधव (वय ४२, रा.आरणगाव, ता.शिरूर) यांनी शिक्रापूर (ता.शिरूर) पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला. जाधव हे आरणगाव येथील शेतात गेले असता त्यांची पत्नी गावांमध्ये गेली होती तर आई आजारी असल्याने बाहेर झोपलेली होती. यावेळी संतोष यांची पत्नी घरी आली असता त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. त्यानंतर संतोष व पत्नी यांनी कपाटात ठेवलेले पत्नीचे चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे आढळून आले.

Web Title: Todays Latest District Marathi News Rjs22b00754 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..