भैरवनाथ विद्यालयात शिक्षक दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भैरवनाथ विद्यालयात शिक्षक दिन
भैरवनाथ विद्यालयात शिक्षक दिन

भैरवनाथ विद्यालयात शिक्षक दिन

sakal_logo
By

रांजणगाव सांडस, ता. ८ ः आलेगाव पागा (ता. शिरूर) येथील भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षकांच्या भूमिकेतून संपूर्ण दिवसभराचे शालेय कामकाज पाहिले. या कार्यक्रमाला इयत्ता दहावी व बारावीतील विद्यार्थी शिक्षक म्हणून सहभागी झाले होते. शिक्षक होणे किती जबाबदारीचे व अवघड काम आहे हे मुलांनी मनोगतात मांडले. विद्यार्थिनी मुख्याध्यापक म्हणून आकांक्षा जोरी या विद्यार्थ्यांनी काम पाहिले. आपले शिकवतांनाचे अनुभव भूषण आबनावे, ओम भालेकर, तनुजा गुंजाळ, नेत्रा टुले या विद्यार्थ्यांनी सांगितले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी शिक्षक पदाला खूप मोठी उंची प्राप्त करून दिली आहे, असे मत शिरूर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, सेकंडरी स्कूल सोसायटीचे संचालक प्राचार्य तुकाराम बेनके यांनी आपल्या मनोगतात मांडले. या वेळी प्रा. संतोष शेळके, संभाजी कुटे, आशिष गव्हाणे, महेश काळे यांनी मनोगत व्यक्त केले. नितीन गरुड, अंबादास गावडे, दिलीप वाळके, सुप्रिया काळभोर, जोती गजरे, शरद शेलार, रवींद्र चौधरी, मच्छिंद्र बेनके, बाबूराव मगर उपस्थित होते. सूत्रसंचालन निकिता वाघचौरे व श्रद्धा धावडे यांनी केले. तर, आभार साक्षी दगडे हिने मानले.


ssociated Media Ids : RJS22B01761, RJS22B01762

Web Title: Todays Latest District Marathi News Rjs22b00756 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..