भैरवनाथ विद्यालयात पाककला, भजन स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भैरवनाथ विद्यालयात
पाककला, भजन स्पर्धा
भैरवनाथ विद्यालयात पाककला, भजन स्पर्धा

भैरवनाथ विद्यालयात पाककला, भजन स्पर्धा

sakal_logo
By

रांजणगाव सांडस, ता. १२ ः आलेगाव पागा (ता. शिरूर) येथील श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सव निमित्ताने पाककला आणि भजन स्पर्धा घेण्यात आल्या.

स्पर्धेचे उद्‍घाटन उरळगावचे माजी उपसरपंच अशोक कोळपे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालय नेहमीच अनेक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत असते, त्याबद्दल सर्व शिक्षकवृंद व शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके यांना कोळपे यांनी धन्यवाद दिले.

स्पर्धेचे नियोजन उपप्राचार्य संभाजी कुटे व गोरक्ष डुबे यांनी केले, तर पाककलेच्या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुप्रिया काळभोर आणि ज्योती गजरे यांनी कले. भजन स्पर्धेचे परीक्षण शरद शेलार व दत्तात्रेय वेताळ यांनी केले.

पाककला स्पर्धेचा निकाल ः लहान गट ः (इ. ५ वी ते ८ वी) प्रथम क्रमांक- गौरी कुंभकर्ण, द्वितीय- (विभागून) भक्ती शिंदे व वैष्णवी रासकर, तृतीय- आयशा गुंजाळ.
मोठा गट ः (९ वी ते १२ वी) प्रथम- स्नेहल रासकर, द्वितीय- श्रेया वाघचौरे, तृतीय- श्रध्दा धावडे.

भजन स्पर्धा फक्त मोठ्या गटातच घेण्यात आल्या. त्यामध्ये प्रथम क्रमांक- सोनाली जाधव, द्वितीय - ऋतुजा बागल, तृतीय - संस्कृती वाळके व समिक्षा चौरे यांनी पटकाविला.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अंबादास गावडे, दिलीप वाळके, नितीन गरूड, नवनाथ डुबे, सतीश अवचिते, बाबूराव मगर, मच्छिंद्र बेनके आदींनी परीश्रम घेतले.
---------------------------

Web Title: Todays Latest District Marathi News Rjs22b00758 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..