शिवतक्रार म्हाळुंगीतील स्मशानभूमीत वृक्षारोपण शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरूर) ः आमदार ॲड. अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करताना मान्यवर. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवतक्रार म्हाळुंगीतील स्मशानभूमीत वृक्षारोपण 
शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरूर) ः आमदार ॲड. अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करताना मान्यवर.
शिवतक्रार म्हाळुंगीतील स्मशानभूमीत वृक्षारोपण शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरूर) ः आमदार ॲड. अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करताना मान्यवर.

शिवतक्रार म्हाळुंगीतील स्मशानभूमीत वृक्षारोपण शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरूर) ः आमदार ॲड. अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करताना मान्यवर.

sakal_logo
By

रांजणगाव सांडस, ता. १३ ः आमदार ॲड. अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील स्मशानभूमी परिसरात दोनशे नारळाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. लायन्स क्लब पुणे यांनी ही रोपे मोफत भेट दिली होती.

येथील स्मशानभूमी परिसरात सलग चार वर्षे आमदार पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात येऊन या वृक्षाचे संगोपन करण्यात आले आहे. त्यामुळे स्मशानभूमी परिसरात हिरवाई बहरली आहे, तर दुसरीकडे भविष्यात या झाडांपासून उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे यांनी व्यक्त केले.

यावेळी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विकास शिवले, माजी सभापती सुभाष उमाप, सरपंच कमल शिवले, अमृत सहकारी दूध संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण शिवले, माजी सरपंच मोहन येळे, चिंतामण टेमगिरे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रेय शिवले, दादासाहेब शिवले आदी उपस्थित होते.
---------------------------------

Web Title: Todays Latest District Marathi News Rjs22b00762 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..