बेनकेनगर शाळेमध्ये पारंपारिक खेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेनकेनगर शाळेमध्ये
पारंपारिक खेळ
बेनकेनगर शाळेमध्ये पारंपारिक खेळ

बेनकेनगर शाळेमध्ये पारंपारिक खेळ

sakal_logo
By

रांजणगाव सांडस, ता. १ ः आलेगाव पागा (ता. शिरूर) येथील बेनकेनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये भोंडल्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सर्वप्रथम हत्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पारंपारिक भोंडल्याची गाणी, पारंपारिक खेळ, देवीची गाणी, भजन, उखाणे, रास दांडिया, गरबा, नृत्याचा आनंद लुटत आदी उपक्रमांचा यामध्ये समावेश करण्यात आला. सर्व महिलांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.
या कार्यक्रमासाठी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका छायाताई बेनके, मंगलताई बेनके, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रियांका बेनके, केंद्र प्रमुख दगडू वेताळ, प्राथमिक शिक्षिका रेखाताई लंघे, सुनंदा काळे, स्मिता झिंझुर्के, उज्ज्वला जगदाळे, ललिता देवरे, माध्यमिक शाळा आलेगाव पागा येथील सहशिक्षिका ज्योती गजरे, विद्या डुबे, महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी हार्मोनिअम वादक दत्तात्रेय वेताळ, पखवाज वादक गुणवंत शिंदे, भजन गायक संदीप बेनके आदींनी मोलाचे सहकार्य केले.
बिडगर यांनी सर्वांचे स्वागत केले. तर मीनाक्षी आनोसे यांनी आभार मानले. खिरापत वाटून कार्यक्रमाची सांगता झाली.