आर्थिक व डिजिटल साक्षरतेचे रांजणगाव सांडसला शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर्थिक व डिजिटल साक्षरतेचे
रांजणगाव सांडसला शिबिर
आर्थिक व डिजिटल साक्षरतेचे रांजणगाव सांडसला शिबिर

आर्थिक व डिजिटल साक्षरतेचे रांजणगाव सांडसला शिबिर

sakal_logo
By

रांजणगाव सांडस, ता. ९ ः नाबार्ड व यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रांजणगाव सांडस शाखेच्या वतीने परिसरातील शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक व युवक- युवतींसाठी आर्थिक व डिजिटल साक्षरता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार व संगीता शेवाळे यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरात प्रामुख्याने नवीन बचत खाती उघडून घेणे, दोन लाख विमा संरक्षण, एटीएम कार्ड व बँकेच्या शैक्षणिक कर्ज, विविध कर्जांसह बँकेच्या अन्य योजनांबाबत माहिती देण्यात आली.

याप्रसंगी रांजणगाव सांडस येथील श्री दत्तकृपा महिला स्वयंसहायता महिला बचत गट,
साईकृपा, राजमाता अहिल्यादेवी व सिद्धनाथ स्वयंसहायता महिला बचत गटांना सवलतीच्या व्याजदरामध्ये कर्ज वितरण करण्यात आले.

याप्रसंगी वडगाव रासाई विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष सचिन पवार,
रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष संतोष रणदिवे, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज दूध) माजी संचालक जीवन तांबे, सरपंच उत्तम लोखंडे, पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक निखिल तांबे, उपसरपंच संध्या रणदिवे, शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालिका संगीता शेलार, बाळासाहेब रणदिवे आदी उपस्थित होते.

विभागीय अधिकारी सचिन रणदिवे, विकास अधिकारी प्रमोद राजगुरू, रामदास रणदिवे, सचिन बोरकर, स्वप्नील लोखंडे, राजेंद्र महामुनी, संग्राम निंबाळकर आदींनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.
----------------------------